शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर छापा; तब्बल १०३ सिलिंडरच्या टाक्या जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 17:43 IST

तपासादरम्यान घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापरासाठी तसेच काळाबाजारासाठी साठा करून ठेवण्यात आल्याचे उघड झाले.

पुणे: घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दुकानावर काळेपडळ पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल १०३ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून एका इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन हनुमंत होळकर (वय ३८, रा. हांडेवाडी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेपडळ पोलिसांना हांडेवारी परिसरात एक व्यक्ती हा घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये गॅस ट्रान्स्फर करत असल्याची माहिती तसेच गॅस सिलिंडरच्या अवैध गॅस साठा व विक्रीबाबतची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. तपासादरम्यान घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापरासाठी तसेच काळाबाजारासाठी साठा करून ठेवण्यात आल्याचे उघड झाले.

पोलिसांनी घटनास्थळावरून १०३ गॅस सिलिंडर आणि इतर साहित्य जप्त केले. या मालाची अंदाजे किंमत सुमारे ९० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. संबंधित आरोपीकडे गॅस साठवणुकीसाठी आवश्यक परवाना नसल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Black market gas bust; 103 cylinders seized, one arrested.

Web Summary : Pune police raided a shop in Kalepadal, busting a black market operation involving domestic gas cylinders. 103 cylinders were seized, and one person, Nitin Holkar, was arrested for illegally transferring gas and stocking cylinders without a permit. The seized goods are valued over ₹90,000.
टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCylinderगॅस सिलेंडरMONEYपैसाfraudधोकेबाजीHadapsarहडपसर