शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

Pune Water Supply News: निम्म्या पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद; पहा तुमच्या भागात पाणी येणार आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 10:49 IST

गुरुवारी (१२ जून) शहराच्या पूर्व व पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार असून शुक्रवारी (१३ जून) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

पुणे: वारजे जलशुद्धीकरण केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध पाणी साठवण टाक्यांना नवीन जलवाहिन्या जोडणे आणि व्हाॅल्व्ह बसविण्याच्या कामासाठी तसेच भामा-आसखेड प्रकल्पांतर्गत पाणी वितरणामधील त्रुटी दूर करण्यासाठी येत्या गुरुवारी (१२ जून) शहराच्या पूर्व व पश्चिम भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर शुक्रवारी (१३ जून) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

वारजे जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत बालेवाडी जकात नाका टाकी, सन हॉरीझोन टाकी, बाणेर वेस्ट टाकी, पाषाण लेक टाकी, लोकसेवा (सुस), बाणेर पाषाण लिंक रोड टाकी, पॅनकार्ड क्लब रोड टाकी येथे मुख्य पाण्याच्या लाईनला नव्याने टाकण्यात आलेल्या लाईन जोडण्यात येणार आहेत. तसेच व्हाॅल्व्ह बसविण्यात येणार आहेत. याशिवाय भामा-आसखेड अंतर्गत येणाऱ्या भागामध्ये पाणी वितरणामधील त्रुटी दूर करण्यासाठी चाचणी घेण्यासाठी गुरुवारी खालील भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग 

वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर 

पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी, चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरूगणेश नगर, सुरजनगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्करखिंड परिसर, शास्त्रीनगर, व्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाण तांडा, मोहननगर, सुस रोड, धनकुडे वस्ती, पंचवटी, म्हाळुंगे, सुस इ.

पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर 

बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडीपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकर नगर, दत्तनगर इ.

भामा-आसखेड प्रकल्प 

धानोरी, वडगाव शेरी, खराडी, विमाननगर, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, येरवडा, संजय पार्क, लोहगाव, बोराटे वस्ती, शेजवळ पार्क खराडी इ.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDamधरणSocialसामाजिकRainपाऊस