शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 10:41 IST

या संपूर्ण प्रकारात एचआरची भूमिका संशयास्पद आहे. एका महिला अधिकाऱ्याने पीडितेला तक्रार दाखल करण्यास मनाई केली. अशा गोष्टी होत राहतात असं तिला सांगण्यात आले.

नाशिक - शहरातील TCS BPO कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी सर्वात जास्त चर्चा ज्या नावाची होत आहे ती म्हणजे HR मॅनेजर निदा खान..सहकारी कर्मचारी तिला दबंग मॅम म्हणून बोलवायचे. ऑफिसमधील तिचा वावर इतका प्रभावशाली होता की तिला सगळेच घाबरायचे. 

FIR मधील आरोपानुसार, निदा खान केवळ एचआरच्या भूमिकेत मर्यादित नव्हती तर ती अशा टीम लीडर्ससोबत नजरेस यायची ज्यांच्यावर महिला कर्मचाऱ्यांचा छळ आणि बळजबरीने धर्मांतरासाठी दबाव टाकण्याचा आरोप आहे. ती महिलांना इस्लामी परंपरेनुसार कपडे घालायला, प्रथेचे पालन करायला सांगत होती. ती सल्ला देत नव्हती तर महिला कर्मचाऱ्यांवर दबाव आणायची. महिलांनी बुरखा कसा घालायचा हे ती कर्मचाऱ्यांना सांगत होती असं समोर आले आहे. नाशिकमध्ये दाखल गुन्ह्यात निदा खानचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. एका संघटित समुहाने महिला कर्मचाऱ्यांना कंपनीत टार्गेट केले होते. त्यांच्यावर लैंगिक अतिप्रसंग आणि धार्मिक दबाव टाकला जात होता.

एका पुरुष कर्मचाऱ्यानेही तक्रार दाखल केली आहे. ज्यात ऑफिसमध्ये धार्मिक अत्याचार आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. ७ पुरुष आरोपी एका टोळीसारखे काम करत होते. हे सर्व कर्मचारी कंपनीत जबाबदारीच्या पदावर होते. आपल्या पदाचा गैरवापर करून ते कर्मचाऱ्यांवर दबाव आणायचे. महिलांना सारखे बघत राहायचे, त्यांच्यासमोर अश्लील चाळे करायचे. खासगी आयुष्यावर आक्षेपार्ह टीप्पणी करायचे. विरोध केल्यावर अधिक त्रास दिला जायचा असा आरोप या आरोपी पुरुष कर्मचाऱ्यांवर आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारात एचआरची भूमिका संशयास्पद आहे. एका महिला अधिकाऱ्याने पीडितेला तक्रार दाखल करण्यास मनाई केली. अशा गोष्टी होत राहतात असं तिला सांगण्यात आले. त्यामुळे अनेक घटना उघडकीस आल्या नाहीत. आरोपींनी एक व्हॉट्सग्रुप बनवला होता. ज्यातून कर्मचाऱ्यांना टार्गेट केले जायचे. या ग्रुपमध्ये निदा खानही होती. काही प्रकरणात कर्मचाऱ्यांना बळजबरीने नमाज पठण करणे, मांसाहार करायला लावणे, धार्मिक छळ करण्याचा प्रयत्न सुरू होता. एका कर्मचाऱ्याला जबरदस्तीने टोपी घालून त्याला नमाज पठण करायला भाग पाडले. त्याचा फोटोही घेतला. महिला कर्मचाऱ्यांसोबत लैंगिक छळ केल्याचे समोर आले. आतापर्यंत या प्रकरणी ८ आरोपींना अटक केली आहे. ज्यात ७ पुरुष आणि १ महिला समाविष्ट आहे. निदा खान अद्यापही फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहे. 

कंपनीनेही घेतली दखल

टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनीही या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत हे चिंताजनक असल्याचं म्हटले. या प्रकरणातील सर्व तथ्ये पडताळून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं. सुरुवातीला या प्रकरणात एकच तक्रार समोर आली होती. परंतु कौन्सलिंगनंतर अन्य पीडित महिलाही समोर आल्या. त्यानंतर एका पाठोपाठ एक असे ९ गुन्हे नोंदवण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाची भूमिका निदा खानची मानली जाते. तिच्या अटकेनंतर आणखी खुलासे होऊ शकतात असं पोलिसांना वाटते. 

ब्रेनवॉश करायची निदा खान

हा प्रकार समोर आल्यानंतर भाजपासह हिंदुत्ववादी संघटनांनी नाशिकच्या कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले. तपासात व्हॉट्सअप चॅटमध्ये इमरान नावाच्या एका व्यक्तीचे नाव समोर आले. जो कथितपणे मलेशियाशी संबंधात आहे. इमरान चिथावणीखोर विधाने करून कर्मचाऱ्यांवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत होता. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये HR मॅनेजर निदा खान हिचाही समावेश होता.

English
हिंदी सारांश
Web Title : HR Manager Forced Burqa on Employees: TCS BPO Conversion Scandal

Web Summary : TCS BPO Nashik faces धर्मांतर allegations. HR Manager Nida Khan allegedly pressured women to wear burqas and convert. A male employee also filed a complaint. Police have arrested eight, Nida is absconding.
टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी