Rasikh Salam Dar Comeback King : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातील रसिख सलाम दार याने आपल्या गोलंदाजीतील खासियत दाखवून देताना लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातील चौघांची शिकार करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण तुम्हाला माहितीये का? बंगळुरच्या एम. चिन्नास्वामीच्या पाटा खेळपट्टीवर LSG च्या तगड्या फलंदाजांना गुडघे टेकालया लावणाऱ्या रसिख सलाम दार या जम्मू काश्मीरच्या गोलंदाजाचा प्रवास सहज सोपा नव्हता. वय लपवल्यामुळे या गोलंदाजावर BCCI नं दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली होती. करिअर सुरु होण्याआधीच बदनामीचा डाग लागल्यामुळे त्याचे करिअर धोक्यात आले होते. पण तो यातून सावरून आता पुन्हा मैदान गाजवताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वय लपवल्याचा ठपका, BCCI नं घातली होती दोन वर्षांची बंदी
रसिख सलाम दार हा जम्मू काश्मीर येथील कुलगाम जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून येतो. त्याचे वडील एका सरकारी शाळेवर शिक्षक आहेत. २०१९ च्या IPL मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून त्याने पदार्पण केले होते. वयाच्या १८ व्या वर्षी IPL पदार्पणासह तो IPL मध्ये खेळणारा जम्मू काश्मीरचा सर्वात युवा क्रिकेट ठरला. पण ज्या वयाच्या जोरावर त्याने ऐतिहासिक कपदार्पण केलं त्यात खोट निघाली. भारतीय अंडर १९ संघात संधी मिळाल्यावर त्याने वय लपल्याची गोष्ट समोर आली. परिणामी इंग्लंड दौऱ्यावरील १९ वर्षांखालील संघात निवड होऊनही तो संघाबाहेर झाला. एवढेच नाही तर BCCI नं त्याच्यावर दोन वर्षांची बंदही घातली. हा काळ क्रिकेटरसाठी भयावह स्वप्नासारखाच होता.
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
बंदीनंतर कुणी दिली पहिली संधी?
वय लपल्यामुळे क्रिकेटच्या कारकिर्दीला २ वर्षांचा ब्रेक लागला. या काळातही त्याने आपली मेहनत कायम ठेवली. २०२२ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्संने त्याला कमबॅकची संधी दिली. २० लाख या मूळ किंमतीसह तो शाहरुखच्या मालकीच्या KKR संघात सामील झाला. पण इथं त्याला फारशी संधी मिळाली नाही. २०१९ च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून पदार्णात एकही विकेट न मिळालेल्या रसिख सलाम २०२२ च्या हंगामात कोलकाताकडून दोन सामने खेळला. इथंही तो विकेट लेस राहिला.
DC कडून छाप सोडली, मग RCB नं केलं 'करोडपती'
२०२४ च्या हंगामात तो ३० लाख या मूळ किंमतीसह दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळताना दिसला. या फ्रँचायझी संघाकडून ८ सामन्यात ९ विकेट्स घेत त्याने खास छाप सोडली. आरसीबीच्य संघाने या गोलंदाजातील क्षमता ओळखली. त्यांनी मिनी लिलावात तब्बल ६ कोटी खर्च करून त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. लखनौ संघाविरुद्ध त्याने हिंमत दाखवून पैसा वसूल शो दाखवण्याची आपली धमक दाखवून दिली.
ताशी १४० किमी प्रति तास वेग अन् गोलंदाजीत हुशारी
रसिख सलाम दार हा १० किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. आपल्या वेगाशिवाय गोलंदाजीतील कमालीच्या व्हेरिएशनसह तो प्रतिस्पर्धी संघाला कोड्यात टाकण्यातही माहीर आहे. मॉडर्न क्रिकेटमध्ये फलंदाजांचा बोलबाला दिसत असताना जम्मू काश्मीरच्या या गोलंदाजाने स्लोअर बॉलसह आपल्या गोलंदाजीची धार वाढवली आहे. गोलंदाजी शैलीत किंचितही बदल न करता तो 'नकल बॉल' आणि 'ऑफ कटर' वर फलंदाजांना चकवा देतो. गोलंदाजीतील ही खासियतच त्याला RCB हिरो ठरवते. किंग कोहलीच्या ताफ्यात आता या युवा गोलंदाज कमबॅक किंगच्या रुपात ओळख निर्माण करताना दिसत आहे.
Web Summary : Rasikh Salam Dar overcame a BCCI ban for age fraud to shine. After early struggles, RCB recognized his talent, investing in him. His recent performance against LSG highlights his skill and comeback story, making him a key player.
Web Summary : रासिख़ सलाम डार ने उम्र में धोखाधड़ी के लिए बीसीसीआई के प्रतिबंध को पार कर चमक बिखेरी। शुरुआती संघर्षों के बाद, RCB ने उनकी प्रतिभा को पहचाना और उनमें निवेश किया। LSG के खिलाफ हालिया प्रदर्शन उनकी कुशलता और वापसी की कहानी को उजागर करता है, जिससे वह एक महत्वपूर्ण खिलाड़ी बन गए हैं।