Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो झाले व्हायरल

Virat Kohli Sanjiv Goenka viral photos: संघ पराभूत झाल्यावर एरव्ही संतापणारे संजीव गोयंका यावेळी हसताना दिसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 11:09 IST

Open in App

Virat Kohli Sanjiv Goenka viral photos: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने यंदाच्या हंगामातील विजयी घोडदौड सुरु ठेवली. लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध रसिख सलामने २४ धावांत ४ बळी घेत त्यांनी १४६ धावांवर रोखले. हे आव्हान बंगळुरुने १५ षटकांतच पार केले. विराट कोहलीने ३४ चेंडूत ४९ धावा करत संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यात मोठा वाटा उचलला. विराटचे अर्धशतक हुकले, पण संघाने मात्र विजय पटकावला. या महत्त्वपूर्ण खेळीनंतर विराट कोहलीने LSG चे मालक संजीव गोयंका यांची भेट घेतली. त्या भेटीची सध्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्याचे दिसत आहे.

विराट कोहली - संजीव गोयंका भेटीची चर्चा

बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर बंगळुरुच्या विजयापेक्षाही विराट कोहली आणि संजीव गोयंका यांच्यात झालेल्या संवादाची जास्त चर्चा होत आहे. सहसा लखनौचा संघ पराभूत झाल्यास संजीव गोयंका प्रचंड संतापलेले किंवा नाराज दिसतात. पण जेव्हा सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ एकमेकांना भेटत होते, तेव्हा विराट कोहली स्वतः संजीव गोयंका यांच्याजवळ गेला. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि काही काळ हसत-खेळत गप्पा मारल्या.

जुन्या वादाचा विसर

गेल्या काही हंगामात लखनौ आणि आरसीबी यांच्यातील सामन्यांमध्ये मैदानावर बराच तणाव पाहायला मिळाला होता. नवीन-उल-हक आणि गौतम गंभीरसोबत विराटचा झालेला वाद चर्चेचा विषय राहिला होता. मात्र, गोयंका आणि कोहली यांच्यातील ही भेट खूपच सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. संजीव गोयंका यांनीही विराटच्या खेळीचे कौतुक केल्याचे फोटोंवरून स्पष्ट होत आहे. या भेटीत कोणत्याही प्रकारचा तणाव नसून उलट एकमेकांबद्दलचा आदर आणि खेळकर वातावरण दिसून आले.

सोशल मीडियावर चर्चा

हे फोटो ट्विटर (X) आणि इन्स्टाग्रामवर येताच नेटकऱ्यांनी याला 'स्पिरिट ऑफ क्रिकेट' असे संबोधले आहे. "खेळ मैदानात असतो, पण मैदानाबाहेर आदर महत्त्वाचा असतो," अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तसेच चाहत्यांनी विराटच्या खेळीचीही प्रशंसा केली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Virat Kohli greets LSG owner Sanjiv Goenka after match, photos viral

Web Summary : After RCB's win against LSG, Virat Kohli met and chatted with LSG owner Sanjiv Goenka, sparking social media buzz. This interaction, a departure from past tensions, showcased respect and sportsmanship. Kohli's crucial innings and the friendly exchange became talking points.
टॅग्स :आयपीएल २०२६लखनौ सुपर जायंट्सविराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरव्हायरल फोटोज्