शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 11:44 IST

Ashok Kharat : अंकशास्त्रामध्ये निष्णात असल्याचा दावा करणारा भोंदू अशोक खरात स्वतः साठी ९ हा शुभांक समजायचा, त्यामुळेच त्याच्या दोन्ही मोटारींसाठी त्याने आरटीओमधून त्याच प्रकारचे 'चॉइस' क्रमांक घेतल्याचं तपासात पुढे आलं आहे.

अंकशास्त्रामध्ये निष्णात असल्याचा दावा करणारा भोंदू अशोक खरात स्वतः साठी ९ हा शुभांक समजायचा, त्यामुळेच त्याच्या दोन्ही मोटारींसाठी त्याने आरटीओमधून त्याच प्रकारचे 'चॉइस' क्रमांक घेतल्याचं तपासात पुढे आलं आहे. खरात याने अंकशास्त्र व भविष्य याचा दावा करत अनेकांना गंडा घालण्यासह महिलांचं लैंगिक शोषण केल्याने सध्या त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र आता अंकाचा खेळ खरात याच्यावरच उलटला आहे.

खरात याच्या नऊ या शुभांकाबाबत आता अनेक सुरस बाबी समोर येत आहेत. एका व्यावसायिकाकडून लाटलेल्या मर्सिडिजमधून त्याने सर्वत्र मिरविले. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूने महिलांचा छळ व त्याच्या संपर्कात आलेल्या व्यावसायिकांची अनेक वर्षे फसवणूक, लुबाडणूक करत 'माया' जमविली; मात्र त्याच्या या काळ्या कारनाम्यांचं बिंग अखेर फुटलं अन् लोकांचं भविष्य सांगणाऱ्या भोंदूच्या हाती पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती

खरात प्रकरणाने गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे राजकारणसुद्धा ढवळून निघालं आहे. दररोज नवनवीन प्रकरणं बाहेर येत आहेत. शहर पोलिसांपासून थेट 'ईडी' पर्यंत पोहोचलेल्या या प्रकरणाची व्याप्तीही मोठी आहे. खरातने ज्या व्यावसायिकाकडून बळजबरीची 'मर्सिडिज बेन्ड्रा' ही कार 'गिफ्ट' म्हणून घेतली, त्या कारचा क्रमांक (एम.एच१५ जी.एल ८१८१) असा निवडला. ८१८१०१८ अशी बेरीज येते. १८. या अंकाचं जेव्हा एक अंकी रूपांतर केलं जातं तेव्हा ९ हा अंक तयार होतो. त्याचप्रमाणे त्याच्या बंगल्यात उभ्या असलेल्या दुसन्या एका काळ्या रंगाच्या मोटारीचा क्रमांक (२६बीएच ६४५३ई) असा घेतलेला आहे. या क्रमांकाचंही वरीलप्रमाणे बेरीज आणि एक अंकी रूपांतर केल्यास '९' असा अंक येतो.

भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला

 "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार

...म्हणून '९' अंकाला पसंती

९ अंक हा बंधुत्व, वैश्विक कल्याण, पैसा, भाग्य, प्रवास, खेळ आणि घटनांची पूर्तता यांचे प्रतीक आहे असं अंकशास्त्रानुसार मानलं जातं. तसेच हा अंक समृद्धी, औदार्य आणि मानवतावादी कार्याशी जोडलेला आहे असंही मानलं जातं. तसेच पैसा आणि समृद्धी आकर्षित करण्याशी संबंधित असलेला अंक ९ आहे, असं सुद्धा अंकशास्त्रानुसार मानण्यात येतं. अंकशास्त्रानुसार, ९ या अंकाचा अधिपती ग्रह मंगळ असल्याचं सांगितलं जातं.

English
हिंदी सारांश
Web Title : Numerology fraudster Ashok Kharat's obsession with number 9 backfires.

Web Summary : Self-proclaimed numerologist Ashok Kharat, arrested for fraud and sexual assault, favored the number 9, using it in his car registrations. He exploited beliefs for financial gain and abused women. His crimes have now been exposed, leading to his arrest.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातCrime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस