शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 12:49 IST

दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या हनीट्रॅप आणि रोमान्स घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी देशभरातील ५०० हून अधिक महिलांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या एका कुख्यात ठगाला अटक केली आहे. आरोपीने डेटिंग आणि मॅट्रिमोनिअल प्लॅटफॉर्मवर अत्यंत सुनियोजित पद्धतीने आपले काम चालवले होते.

दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या हनीट्रॅप आणि रोमान्स घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे, हे प्रकरणही अयान तनवीर सारखेच आहे. तनवीर अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करत होता.  नंतर त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलत होता. दरम्यान, पश्चिम बंगालच्या आनंद कुमारने महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळले. तनवीरने अनेक मुलींना लक्ष्य केले होते, तर पश्चिम बंगालच्या आनंदने ५०० हून अधिक महिलांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात

दिल्ली पोलिसांनी एका धूर्त ठगाला अटक केली आहे, त्याने देशभरातील ५०० हून अधिक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळले होते. आरोपी सुनियोजित होता आणि डेटिंग व मॅट्रिमोनिअल प्लॅटफॉर्मवर सक्रिय होता. दक्षिण-पश्चिम जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशनने सांगितले की, बनावट ओळख निर्माण करून त्याने देशभरातील ५०० हून अधिक महिलांना आपल्या जाळ्यात ओढले. सुमारे २ कोटी रुपयांची फसवणूक केली. आरोपीची ओळख पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथील रहिवासी, ३५ वर्षीय आनंद कुमार अशी पटली आहे.

कधी डॉक्टर, कधी निर्माता, कधी व्यावसायिक

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी डेटिंग आणि वैवाहिक प्लॅटफॉर्मवर पद्धतशीरपणे सक्रिय होता. तो कधी डॉक्टर, कधी चित्रपट निर्माता, तर कधी व्यावसायिक असल्याचे भासवून महिलांशी संपर्क साधायचा आणि हळूहळू त्यांचा विश्वास संपादन करायचा. भावनिक नाते निर्माण झाल्यावर, तो त्यांना लग्नाची आश्वासने देऊन आमिष दाखवायचा आणि नंतर पैशांची मागणी करायचा.

'वैभव अरोरा' नावाच्या इंस्टाग्राम प्रोफाइलद्वारे एका महिलेची अंदाजे ७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार तिने सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात केल्यानंतर हे संपूर्ण नेटवर्क उघडकीस आले. आरोपीने सुरुवातीला एका डेटिंग ॲपवर तिच्याशी संपर्क साधला आणि नंतर संभाषण इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर नेले. अनेक मोबाईल नंबर वापरून त्याने त्या महिलेसोबत जवळीक साधली आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले.

तांत्रिक तपासाद्वारे अटक

तपासादरम्यान, पोलिसांनी सोशल मीडिया खाती, मोबाईल क्रमांक आणि बँक व्यवहारांचे बारकाईने विश्लेषण केले. डिजिटल पुराव्याच्या आधारे, पश्चिम बंगालच्या २४ परगणा परिसरात आरोपीचे दोन मोबाईल क्रमांक सक्रिय असल्याचे आढळून आले. त्यानंतर, पोलीस पथकाने त्या परिसरात छापा टाकून आरोपीला अटक केली.

आरोपीला अटक केली असता, त्याच्याकडून चार स्मार्टफोन, आठ सिम कार्ड, तीन डेबिट कार्ड आणि त्याने फसवणूक केलेल्या पैशातून खरेदी केलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पोलिसांच्या मते, या जप्तीमुळे एका मोठ्या गुन्हेगारी नेटवर्क असल्याचा संशय पोलिसांना होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Paratwada scandal to Bengal fraud: Men cheat women, expose revealed.

Web Summary : Delhi Police exposed romance scams. Tanveer exploited girls, while Anand defrauded 500+ women of ₹2 crore via dating apps, posing as professionals to gain trust before seeking money.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी