Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 14:38 IST

Share Market Allbirds Inc Stock Price:  शेअर बाजारात अनेकदा चमत्कार पाहायला मिळतात आणि असाच काहीसा प्रकार एका शेअरबाबत घडला. पाहा कोणता आहे हा शेअर.

Share Market Allbirds Inc Stock Price:  शेअर बाजारात अनेकदा चमत्कार पाहायला मिळतात आणि असाच काहीसा प्रकार बुधवारी अमेरिकन शेअर बाजारात घडला. तोट्यामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या 'ऑलबर्ड्स' (Allbirds Inc.) या लोकरीचे शूज बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं अचानक 'रॉकेट' स्पीड पकडला. कंपनीने घेतलेल्या एका निर्णयामुळे केवळ तिचं नावच बदललं नाही, तर कोसळणाऱ्या शेअर्सना जबरदस्त उभारी दिली.

कंपनीचा शेअर सकाळी केवळ २.४९ डॉलर्सवर (सुमारे २३० रुपये) उघडला होता, मात्र संध्याकाळी तो १६.९९ डॉलर्सवर (सुमारे १,८४० रुपये) बंद झाला. म्हणजेच एकाच दिवसात तब्बल ५८२% ची वाढ नोंदवण्यात आली. या 'AI' क्रांतीमुळे कंपनीचं मार्केट कॅप २२ मिलियन डॉलर्सवरून थेट १५० मिलियन डॉलर्सवर पोहोचलं.

रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?

४ अब्ज डॉलर्सचं होतं व्हॅल्युएशन 

एकेकाळी ऑलबर्ड्सचं मूल्य ४ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होतं. मात्र, उत्पादनांची कमी मागणी आणि सततचा तोटा यामुळे कंपनीची व्हॅल्युएशन अवघ्या २२ मिलियन डॉलर्सवर आलं होतं. कंपनीचे स्टोअर्स बंद होत होते आणि भवितव्य अंधकारमय दिसत होतं. अशा परिस्थितीत कंपनीने एक धक्कादायक पण धाडसी निर्णय घेतला. ऑलबर्ड्सनं घोषणा केली की, ती आता शूज बनवणार नाही, तर 'आर्टिफिशियल इंटेलिजेंस' (AI) इन्फ्रास्ट्रक्चरच्या जगात पाऊल ठेवणार आहे. २०२१ मध्ये लिस्ट झाल्यापासून सतत घसरणाऱ्या या शेअरमध्ये या एका घोषणेनं गुंतवणूकदारांमध्ये नवा उत्साह भरला.

आता GPU सेवा देणार

ऑलबर्ड्स आता स्वतःला पूर्णपणे बदलणार आहे. कंपनीने आपला फूटवेअर व्यवसाय थांबवून आर्टिफिशियल इंटेलिजेंस इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात उतरण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या नवीन अवतारात कंपनीचे नाव 'न्यूबर्ड AI' (Newbird AI) असं असेल. कंपनी ५० मिलियन डॉलर्सच्या नवीन निधी उभारणीद्वारे हाय-परफॉर्मन्स GPU  इन्फ्रास्ट्रक्चर खरेदी करणार आहे. भविष्यात 'GPU-एझ-ए-सर्व्हिस' (GPUaaS) आणि 'AI-नेटिव्ह क्लाउड सोल्युशन्स' पुरवठादार म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याचे ऑलबर्ड्सचं लक्ष्य आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : ₹230 Share Soars to ₹1,840: Company's Fortune Turns with AI?

Web Summary : Allbirds' share price skyrocketed 582% after announcing its shift to AI infrastructure. The struggling shoe company, once valued at $4 billion, will now be known as Newbird AI, focusing on GPU services. This move dramatically boosted its market capitalization.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा