अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगालाच अनेक विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. यातच आता, "जागतिक तणाव असला तरी, रशिया भारताला त्याच्या गरजेप्रमाणे कच्चे तेल आणि एलपीजीचा पुरवठा करत राहील," असे भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, अमेरिका आणि युरोपीय देश निर्बंध आणि दबावाच्या माध्यमाने भारत-रशिया संबंधांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, रशिया नेहमीच एक विश्वासार्ह भागीदार राहिला आहे, असेही ते म्हणाले.
भारत-रशिया संबंधांवर बोलताना डेनिस अलीपोव म्हणाले, भारताच्या वाढत्या जागतिक भूमिकेचे रशिया पूर्णपणे समर्थन करतो. दोन्ही देशांतील धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट होत आहे. रशिया नेहमीच भारताचा विश्वासार्ह साथीदार राहिला आहे. ऊर्जा आणि संरक्षणासह अनेक क्षेत्रांत हे सहकार्य वृद्धींगत होईल.
'ब्रिक्स' (BRICS) परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन उपस्थित राहणार? -एका मुलाखतीत बोलताना अलीपोव म्हणाले, सप्टेंबर २०२६ मध्ये भारतात होणाऱ्या 'ब्रिक्स' (BRICS) परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. संरक्षण क्षेत्रात S-400 क्षेपणास्त्र प्रणालीची उर्वरित डिलिव्हरी लवकरच पूर्ण केली जाईल. याशिवाय, भारताने रशियाच्या आधुनिक 'SU-57' लढाऊ विमानासंदर्भातही रुची दाखवली आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.
इराणला शांततापूर्ण हेतूंसाठी अणुऊर्जेचा वापर करण्याचा अधिकार -दरम्यान, अलिपोव्ह यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांचा निषेध केला. तसेच हे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असल्याचे म्हणत, इराणला स्वतःचे संरक्षण करण्याचा आणि शांततापूर्ण हेतूंसाठी अणुऊर्जेचा वापर करण्याचा अधिकार आहे, असेही ते म्हणाले. याच बरोबर, केवळ युद्धविराम पुरेसा नाही, तर दीर्घकालीन वाटाघाटीतून तोडगा काढणे अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले.
भारत रशिया संबंध २०२६, रशिया कच्चा तेल पुरवठा, पुतिन भारत दौरा ब्रिक्स, S-400 मिसाइल अपडेट भारत, India Russia Energy Deal 2026, Putin Visit India BRICS Summit, S-400 Delivery India Russia, Rupee-Ruble Trade 95 Percent.
Web Summary : Despite global tensions, Russia assures India of continued oil and LPG supply, denouncing Western influence on their relations. Russia supports India's global role, strengthening ties in energy and defense. Putin may attend the BRICS summit in India. Russia defends Iran's right to peaceful nuclear energy.
Web Summary : वैश्विक तनाव के बावजूद, रूस ने भारत को तेल और एलपीजी की आपूर्ति जारी रखने का आश्वासन दिया, पश्चिमी प्रभाव की निंदा की। रूस भारत की वैश्विक भूमिका का समर्थन करता है, ऊर्जा और रक्षा में संबंध मजबूत हो रहे हैं। पुतिन भारत में ब्रिक्स शिखर सम्मेलन में भाग ले सकते हैं। रूस ने ईरान के परमाणु ऊर्जा के अधिकार का बचाव किया।