जागतिक राजकारणात आणि व्यापारी मार्गावर वर्चस्व गाजवणारी 'होर्मुजची सामुद्रधुनी' सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे या मार्गावर इराणने जी बंदी घातली होती, त्यावर आता इराणनेच एक नवा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार, आता होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजांना इराणला टोल देण्याची गरज भासणार नाही. मात्र, यासाठी इराणने एक विशिष्ट अट आणि मार्ग सुचवला आहे.
ओमानच्या सीमेचा वापर अन् सुटका!
इराणने तयार केलेल्या नव्या प्रस्तावात म्हटले आहे की, जे जहाज ओमानच्या सीमेजवळून प्रवास करतील, त्यांच्या कामात इराण कोणताही हस्तक्षेप करणार नाही. म्हणजेच या जहाजांना कोणताही कर किंवा टोल द्यावा लागणार नाही. ओमानने यापूर्वीच नैसर्गिक मार्गावरून कोणताही टोल न घेण्याची घोषणा केली होती. जागतिक व्यवस्थेत अडथळा येऊ नये, ही ओमानची भूमिका इराणने मान्य केल्याचे दिसत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिका आणि इराणमध्ये पूर्ण युद्धविराम झाल्यानंतर हा प्रस्ताव अंमलात येईल.
इराणची ही नरमाई का?
१. टोलची मोठी वसुली: आतापर्यंत इराण या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांकडून तब्बल २ मिलियन डॉलरचा (सुमारे १६ कोटी रुपये) टोल वसूल करत होता. अमेरिकेच्या हल्ल्याच्या भीतीने इराणने संपूर्ण मार्ग ब्लॉक केला होता, पण आता इराणने आपली भूमिका काहीशी शिथिल केली आहे.
२. भौगोलिक अडचण: होर्मुज सामुद्रधुनी सुमारे ३४ किमी रुंद आहे. यातील मोठा हिस्सा इराणच्या ताब्यात आहे. ओमानच्या बाजूचा भाग हा उथळ असल्याने तिथून मोठी जहाजे नेणे कठीण आहे. इराणला हे ठाऊक आहे की मोठे टँकर्स त्यांच्याच हद्दीतून जातील, तरीही जागतिक दबाव कमी करण्यासाठी त्यांनी हा ओमानचा पर्याय खुला केला आहे.
होर्मुज मार्ग जगासाठी इतका महत्त्वाचा का?
जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के पुरवठा याच मार्गावरून होतो. सौदी अरेबिया, इराक, कुवैत, यूएई आणि कतर यांसारख्या देशांसाठी हा मार्ग म्हणजे लाईफलाईन आहे. आशिया आणि युरोपला होणारा गॅस आणि तेल पुरवठा याच मार्गावर अवलंबून असल्याने, इराणने हा मार्ग मोकळा केल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.
Web Summary : Iran offers Hormuz Strait solution, waiving tolls for ships using the Omani route. This eases global concerns, potentially lowering oil prices and benefiting economies reliant on this vital waterway.
Web Summary : ईरान ने ओमान मार्ग का उपयोग करने वाले जहाजों के लिए होर्मुज जलडमरूमध्य समाधान पेश किया, टोल माफ किया। इससे वैश्विक चिंताएं कम होंगी, तेल की कीमतें संभावित रूप से कम होंगी और इस महत्वपूर्ण जलमार्ग पर निर्भर अर्थव्यवस्थाओं को लाभ होगा।