शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 15:52 IST

एएनआयच्या एका पॉडकास्ट मुलाखतीत तिने या विषयावर रोखठोक आणि मजेशीर शैलीत भाष्य केले आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत सध्या आपल्या एका खळबळजनक विधानामुळे जबरदस्त चर्चेत आहे. केंद्रीय मंत्री आणि लोजपा प्रमुख चिराग पासवान यांच्यासोबत नाव जोडले जात असल्याच्या चर्चांना कंगनाने पूर्णविराम दिला. एएनआयच्या एका पॉडकास्ट मुलाखतीत तिने या विषयावर रोखठोक आणि मजेशीर शैलीत भाष्य केले आहे. 

काय म्हणाली कंगना? - कंगना म्हणाली, "मी चिराग पासवान यांना गेल्या १० वर्षांपासून ओळखते. आमच्यात जर काही प्रेमप्रकरण किंवा रोमान्स असता, तर आतापर्यंत आम्हाला मुलंही झाली असती." खरे तर, संसदेतील त्यांच्या भेटीचे व्हायरल फोटो आणि व्हिडिओंसंदर्भात प्रश्न विचारला असता कंगना म्हणाली, चिराग एक चांगले मित्र आहेत. लोक विनाकारण त्यांच्या मागे लागले आहेत, यामुळे आता ते मला पाहिल्यानंतर रस्ताही बदलतात, अशी मिश्किल टिप्पणीही कंगनाने यावेळी केली. कंगना आणि चिराग यांनी २०११ मध्ये 'मिले ना मिले हम' या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

याच मुलाखतीत कंगनाने राहुल गांधींवरही भाष्य केले. ती म्हणाली, मी राहुल गांधी यांच्या डोक्यावर विनाकारणच असा ताज ठेऊ शकत नाही, ज्यासाठी ते पात्र नाहीत. याच वेळी पंतप्रधान मोदींचे कंगनाने कौतुक केले. महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख करत ती म्हणाली की, मोदींचे व्यक्तिमत्व समानतेवर आधारित आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Kangana Ranaut Denies Chirag Paswan Affair, Jokes About Having Children

Web Summary : Kangana Ranaut addressed rumors of an affair with Chirag Paswan, humorously stating they would have children by now. She praised Modi and commented on Rahul Gandhi.
टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतchirag paswanचिराग पासवानBJPभाजपा