शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 13:56 IST

दरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या प्रश्नांना उत्तर देताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली असून सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

संसदेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाची कारवाई सुरू झाली आहे. गुरुवारी महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित तीन महत्त्वाची विधेयके ससंदेत मांडण्यात आली. यानंतर, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जनगणना आणि महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. दरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या प्रश्नांना उत्तर देताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली असून सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

लोकसभेत समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक २०२६ आणि मतदारसंघ पुनररचना (परिसीमन) विधेयक - २०२६ ला तीव्र विरोध केला. महिला आरक्षणामध्ये मागास महिलांसाठी स्वतंत्र कोटा असावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच, महिला आरक्षण हे जनगणना आणि मतदारसंघ पुनररचना विधेयकापासून वेगळे करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवरही त्यांनी आक्षेप घेतला. दरम्यान, "आम्ही महिला आरक्षणाचे समर्थक आहोत, पण सरकार अद्याप जनगणना का करत नाही?" असा सवाल अखिलेश यादव यांनी सरकारला केला. यावर अमित शाह यांनी उत्तर दिले.

काय म्हणाले अमित शाह -  अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह म्हणाले, "मी संपूर्ण देशाला सांगू इच्छितो की, जनगणना प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी सरकारने जातीवर आधारित जनगणना करण्याचे ठरवले आहे." सपावर टीका करताना शाह म्हणाले, जर समाजवादी पक्षाच्या हातात सत्ता असती तर त्यांनी प्रत्येक घराला जाती-जातीत विभागले असते.

यावेळी मुस्लीम महिलांना आरक्षण देण्याच्या मागणीवरही गृहमंत्री शाह यांनी भाष्य केले. ते म्हणाले, धर्माच्या आधारावर आरक्षण देणे पूर्णपणे असंवैधानिक आहे. आपले संविधान याची परवानगी देत नाही. जर समाजवादी पक्षाला मुस्लिम महिलांना प्रतिनिधीत्व द्यायचे असेल, तर त्यांनी खुशाल आपल्या सर्व जागांवर त्यांना उमेदवारी द्यावी, त्याला आमची काहीच हरकत नाही."

 

English
हिंदी सारांश
Web Title : Give all tickets to Muslims, no problem: Amit Shah on reservation.

Web Summary : Amit Shah stated caste-based census has begun, criticizing Samajwadi Party's stance on Muslim reservations. He emphasized religion-based reservations are unconstitutional. Shah challenged SP to nominate Muslims on all seats.
टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसदSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAkhilesh Yadavअखिलेश यादवMuslimमुस्लीमreservationआरक्षण