शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 13:31 IST

"महिला आरक्षण तो बहाना है, २०२९ के चुनाव चुराना है?" असाही केला आरोप

Sharad Pawar NCP vs Pm Modi Government: अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज देशाचे दोन तुकडे करण्याच्या तयारीत दिसत आहे हे दुर्दैवी आहे. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. ही बाब अत्यंत स्वागतार्ह व सरकारचे कौतुक करणारी आहे. संसदेत महिलांची संख्या वाढली तर महिलांच्या प्रश्नांना अधिक वाचा फोडता येईल पण या आड सरकार काही डाव तर साधत नाही ना? हा एक प्रश्नही मनात येतोय" अशा शब्दांत नव्याने होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर टीका केली.

"केंद्र सरकार मतदारसंघांची पुनर्रचना करत आहे. पण हे करत असताना लोकसंख्येचा आधार घेतला जात आहे. लोकसंख्येच्या आधारावर जागांचे पुनर्वाटप झाले, तर ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले, त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील राज्यांनी (त्यात महाराष्ट्राही येतो) मोठे प्रयत्न करून लोकसंख्येवर नियंत्रण मिळवले आहे. त्याबदल्यात उत्तरेच्या तुलनेत त्यांच्या जागा कमी केल्या जात असतील तर हे किती योग्य आहे? केंद्र सरकारचा उद्देश स्पष्ट असता तर समान‌ वाटप करत योग्यप्रकारे महिला आरक्षणाची अंमलबजावणी केली असती. पण तसे होताना दिसत नाही," अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाची आठवण सांगितली. "मला अभिमान आहे की आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी १९९४ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३% आरक्षण देऊन महिला आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली होती. महिलांना मुख्य प्रवाहात आणणे हा एकमेव उद्देश त्यांच्या नजरेसमोर होता पण आताचे केंद्र सरकार मात्र अशा पद्धतीने मतदारसंघांची पूर्नरचना करून उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असा वाद पेटवण्याच्या तयारीत दिसत आहे," असेही त्या म्हणाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar Group Criticizes Modi Govt. on 'Akhand Bharat' Stance

Web Summary : NCP's Rohini Khadse criticizes the Modi government, alleging a divide-and-rule approach despite advocating for 'Akhand Bharat.' She questions the fairness of constituency restructuring based on population, fearing injustice to states like Maharashtra that controlled population growth. Khadse highlights Pawar's initiative of 33% women's reservation in local bodies.
टॅग्स :Rohini Khadseरोहिणी खडसेCentral Governmentकेंद्र सरकार