शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 12:22 IST

Bengaluru Man Kills Mother: कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूत जन्मदात्या आईची हत्या करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमधून नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली. राजराजेश्वरी नगर परिसरात एका मुलाने आपल्या ७२ वर्षीय वृद्ध आणि अर्धांगवायूने आजारी असलेल्या आईला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून तिची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या मुलाला ताब्यात घेतले असून पोलीस तपास सुरू आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला गेल्या काही काळापासून अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळलेली होती. तिला दैनंदिन कामांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत होते. आरोपी मुलगा तिच्या प्रकृतीमुळे आणि तिच्या देखभालीमुळे त्रस्त झाला होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेच्या दिवशी, आरोपीने आपल्या आईला चौथ्या मजल्यावर नेले आणि तिथून तिला खाली ढकलून दिले. उंचावरून पडल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस तपास आणि कारवाई

घटनेची माहिती मिळताच राजराजेश्वरी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला हा अपघात किंवा आत्महत्या असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आले. आईच्या आजारपणाला वैतागून मुलाने तिची हत्या केल्याची कबूली दिली. आईच्या आजारपणामुळे आलेला कंटाळा की, मालमत्तेचा वाद या दोन्ही कोनातून पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, पोटच्या मुलानेच अशा क्रूरपणे आईचा जीव घेतल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूर