FASTag New Rules: जर तुमचा फास्टॅग नंबर आणि तुमच्या गाडीचा नंबर एकमेकांशी जुळत नसेल तर आता तुमचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. जर हे दोन्ही नंबर जुळले नाहीत, तर तुमचा फास्टॅग बंद करून तो ब्लॅक लिस्टमध्ये टाकला जाऊ शकतो. टोल प्लाझावर फास्टॅग स्कॅन होताना गाडीचा नंबर आणि फास्टॅग रीडरमधील माहितीमध्ये तफावत असल्याच्या अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. याची दखल घेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं (NHAI) फास्टॅग जारी करणाऱ्या सर्व बँकांना या माहितीची पडताळणी करण्यास सांगितलंय.
बँकांना कठोर तपासणीचे आदेश
NHAI नं बँकांना स्पष्टपणे सांगितलंय की, ज्या नंबरवर फास्टॅग घेण्यात आला आहे, त्याच नंबरवर तो वापरला जात आहे की नाही, याची खात्री करा. यामध्ये कोणतीही हेराफेरी किंवा गडबड केली जात नाही ना, याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर एखाद्या फास्टॅगमध्ये त्रुटी आढळली, तर तो तातडीनं ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावा, असेही बँकांना कळवण्यात आलंय.
NHAI ने काय स्पष्ट केलंय?
NHAI ने या संदर्भात एक निवेदन जारी केलं असून त्यामध्ये खालील बाबी स्पष्ट केल्या आहेत:
कोणत्याही प्रकारची विसंगती टाळण्यासाठी सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून पाहणं आवश्यक आहे.टोल कलेक्शन प्रणालीमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.अशा प्रकारच्या विसंगती मोठ्या प्रमाणात त्या फास्टॅगशी संबंधित आहेत, जे गाडीचा डेटाबेस अधिकृतपणे नोंदवला जाण्यापूर्वीच जारी करण्यात आले होते.
भविष्यातील आव्हानं आणि तंत्रज्ञानावर भर
सुरुवातीच्या काळात तपासणीची व्यवस्था मर्यादित होती आणि 'मॅन्युअल' प्रक्रियेवर अधिक अवलंबून होती. मात्र, NHAI नं स्पष्ट केलंयकी, आगामी काळात देशात 'मल्टी-लेन फ्री फ्लो' (MLFF) सारखी प्रगत टोलिंग यंत्रणा राबवली जाणार आहे. ही यंत्रणा यशस्वी करण्यासाठी फास्टॅग आणि व्हीआरएन म्हणजेच गाडीचा नोंदणी क्रमांक मॅपिंगमधील अचूकता सुनिश्चित करण्यावर विशेष भर दिला जात आहे
Web Summary : NHAI warns FASTags may be blacklisted if vehicle and FASTag numbers mismatch. Banks are ordered to verify data and blacklist faulty FASTags. The move ensures accuracy for future multi-lane free-flow tolling systems, addressing issues from early, less stringent verification processes.
Web Summary : NHAI ने FASTag के ब्लैकलिस्ट होने की चेतावनी दी है अगर वाहन और FASTag नंबर मेल नहीं खाते हैं। बैंकों को डेटा सत्यापित करने और दोषपूर्ण FASTag को ब्लैकलिस्ट करने का आदेश दिया गया है। यह कदम भविष्य में मल्टी-लेन फ्री-फ्लो टोलिंग सिस्टम के लिए सटीकता सुनिश्चित करता है।