By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 12:53 IST
1 / 8चहा प्यायल्यानंतर अनेकांना लगेच पाणी पिण्याची सवय असते. मात्र विज्ञान आणि आयुर्वेद या सवयीला आरोग्याच्या दृष्टीने हितावह मानत नाही. चहा पिण्यापूर्वी पाणी प्यावं की नंतर आणि त्यात किती वेळाचं अंतर असावं हे जाणून घेणं तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण तुमची एक चुकीची सवय तुमची पचनसंस्था बिघडू शकते.2 / 8वाफाळलेल्या चहासोबत अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. दिवसातून अनेकांना तीन-चार वेळा चहा पिण्याची सवय असते. चहा पिण्यापूर्वी पाणी पिणं हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. 3 / 8चहाचा स्वभाव Acidic असतो. उपाशी पोटी चहा प्यायल्याने शरीरातील ॲसिडची पातळी वाढते. जर तुम्ही चहा पिण्यापूर्वी १०-१५ मिनिटं आधी एक ग्लास पाणी प्यायलात, तर ते पोटात एक संरक्षक थर तयार करतं, ज्यामुळे ॲसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याची समस्या कमी होते.4 / 8चहामध्ये 'टॅनिन' नावाचा घटक असतो, ज्यामुळे दातांवर पिवळा थर साचू शकतो. आधी पाणी प्यायल्याने दातांवर एक ओलावा तयार होतो, जो दातांवरील डाग रोखण्यास मदत करतो.5 / 8चहा हे 'डाययुरेटिक' आहे, जे शरीरातील पाणी बाहेर काढून टाकतं. चहापूर्वी पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.6 / 8चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. दातांवर याचा वाईट परिणाम होतो. 7 / 8दातांची सेन्सेटिव्हिटी - चहा गरम असतो आणि पाणी सामान्यतः थंड किंवा साधं असतं. तापमानातील या अचानक बदलामुळे दातांच्या 'इनेमल'वर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे दात दुखू लागतात.8 / 8आयुर्वेदानुसार गरम पदार्थ सेवन केल्यानंतर लगेच थंड पदार्थ घेतल्यास शरीराचं तापमान असंतुलित होतं. चहा पिऊन लगेच पाणी प्यायल्याने पोटाचं तापमान अचानक कमी होतं, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोटात जडपणा किंवा गॅसची समस्या निर्माण होऊ शकते.