इराणमधील अंतर्गत राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याच्या आरोपावरून बिता हेम्मती नावाच्या एका महिलेला इराणने फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे, इराणमध्ये एका महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली बिता ही पहिलीच महिला ठरणार आहे. दरम्यान, बिता हेम्मती यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा ही केवळ गुन्ह्याची शिक्षा नसून, सामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे, अशा भावना व्यक्त केल्या जात आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
या वर्षाच्या सुरुवातीला इराणमध्ये सरकारविरोधात असंतोषाचा भडका उडाला. डिसेंबरच्या अखेरीस तेहरानमधील व्यापाऱ्यांच्या संपाने या आंदोलनाची ठिणगी पडली, जी जानेवारीमध्ये संपूर्ण देशभर पसरली. या आंदोलनात विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या निदर्शनामध्ये बिता हेम्मती हिने सहभाग घेतल्याचा तिच्यावर आरोप आहे.
बिता हेम्मती यांच्यावर झालेले आरोप
इराणी अधिकाऱ्यांनी बिता हेम्मती यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे. सरकारविरोधी सभांना उपस्थित राहणे, राष्ट्रीय सुरक्षेत अडथळा निर्माण करणे, आंदोलने मोडून काढण्यासाठी शस्त्रे आणि आक्षेपार्ह वस्तूंचा वापर करणे आणि देशविरोधी कारवाया करणे, असा तिच्यावर आरोप लावण्यात आले आहेत. दरम्यान, मानवाधिकार संघटनांनी या निर्णयावर संशय व्यक्त केला आहे. ही कायदेशीर प्रक्रिया अत्यंत घाईत पार पाडली गेली असून, आरोपीला आपली बाजू मांडण्याची योग्य संधी मिळाली नसल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.
बिता हेम्मती यांच्यावर झालेले आरोप
बिता हेम्मती यांच्यासह यांचे पती मोहम्मदरेझा माजिद अस्ल आणि इतर दोन सहकारी (बेहरूझ व कोरोश झमानिनेझाद) यांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांचा नातेवाईक अमीर हेम्मती याला राजवटीविरोधात प्रचार केल्याच्या आरोपाखाली ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. या सर्व कारवाया तेहरानमध्ये झाल्या असून, हे शहर सध्या दडपशाहीचे मुख्य केंद्र बनले आहे.
जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण
मानवाधिकार गटांच्या अंदाजानुसार, या निदर्शनांनंतर इराणमध्ये आतापर्यंत १,००० हून अधिक लोकांना विविध शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत. या वाढत्या दडपशाहीमुळे संयुक्त राष्ट्रे आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. जागतिक नेत्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून फाशीच्या शिक्षा थांबवण्याची मागणी केली आहे. सध्या बिता हेम्मती आणि त्यांचे कुटुंब अनिश्चिततेच्या छायेत असून, त्यांच्या फाशीची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
Web Summary : Bita Hemmati faces execution in Iran for protesting. Accused of threatening national security, her trial raises human rights concerns. Her husband and others also received sentences. International community expresses worry.
Web Summary : ईरान में बीता हेम्मती को विरोध प्रदर्शन के लिए मौत की सजा। राष्ट्रीय सुरक्षा को खतरे में डालने का आरोप, मानवाधिकार चिंताएँ बढ़ीं। पति और अन्य को भी सजा। अंतर्राष्ट्रीय समुदाय चिंतित।