By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 11:09 IST
1 / 9भारतीय रेल्वेचे जगात नाव झाले आहे. कोकण रेल्वे मार्ग, श्रीनगर कटरा मार्ग, पंबन बीच अतिशय प्रतिकूल परिस्थिती असूनही भारतीय रेल्वेने या भागांतून ट्रेन सेवा सुरू केली आणि यशस्वी करून दाखवली. भारतात अनेक असे दुर्गम भाग आहेत, जिथे कधी ट्रेन सुरू होईल, असा कोणी विचारही केला नसेल.2 / 9भारतीय रेल्वे जगातील सर्वांत मोठे चौथे रेल्वे नेटवर्क आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता अशा बड्या शहरांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत सुलभ, सहज सेवा सुरू करून देण्यात भारतीय रेल्वेचा हातखंडा आहे. अगदी मुंबई लोकल ट्रेनपासून ते अत्याधुनिक वंदे भारत स्लीपर ट्रेनपर्यंत भारतीय रेल्वेच्या कित्येक सेवा अविरत प्रवाशांच्या सेवेत आजही अव्याहतपणे सुरू आहेत.3 / 9भारतीय रेल्वेच्या ट्रेन सामान्यतः एका इंजिन लावून २२-२४ डब्यांसह ताशी १३० किलोमीटर पर्यंतच्या वेगाने धावतात. १७३ वर्षांपूर्वी याच दिवशी पहिली ट्रेन धावली होती. म्हणजेच सन १८५३ साली याच दिवशी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली होती.4 / 9तत्कालीन बॉम्बे (आताचे मुंबई) येथील बोरी बंदर आणि ठाणे या दरम्यान पहिल्या प्रवासी ट्रेनचा शुभारंभ झाला होता. त्यातून ४०० प्रवाशांनी प्रवास केला होता. रेल्वेच्या नोंदीनुसार, भारताची पहिली रेल्वेगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी दुपारी ३:३५ वाजता तत्कालीन मुंबईतील बोरी बंदर रेल्वे स्थानकावरून सुटली.5 / 9भारताची पहिली रेल्वेगाडी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे या पहिल्या रेल्वे कंपनीद्वारे चालवली गेली. तिचे पोहोचण्याचे स्थानक ३३ किलोमीटर अंतरावर असलेले ठाणे होते. देशातील पहिली रेल्वेगाडी ही एक मोठी घटना होती.6 / 9देशातील पहिल्या रेल्वेने बोरी बंदर ते ठाणे असा प्रवास ७० मिनिटांत पूर्ण केला. ही रेल्वे दुपारी ३:३५ वाजता बोरी बंदर येथून निघाली आणि सायंकाळी ४:४५ वाजता ठाण्याला पोहोचली.7 / 9त्या ट्रेनचे डबे लाकडाचे बनलेले होते. तो काळ वेगळा होता. देशातील पहिल्या ट्रेनबाबत लोकांमध्ये फार उत्साह होता. ३३ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान ट्रेन दोन स्थानकांवर थांबली. बोरी बंदर स्थानकावरून निघून ८ किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर ती भायखळा येथे थांबली. जिथे इंजिनमध्ये पाणी भरण्यात आले.8 / 9भायखळा येथून सुटल्यानंतर ही ट्रेन सायन येथे थोड्या वेळासाठी थांबली. आताच्या घडीला मुंबईतील लोकल ट्रेन अवघ्या काही सेकंदांसाठी स्थानकांवर थांबत असल्या तरी त्या काळातील ट्रेन मधल्या स्थानकावर पंधरा मिनिटे थांबत असे, असे सांगितले जाते. 9 / 9आताच्या घडीला भारतीय रेल्वेचा विस्तार प्रचंड प्रमाणात झाला आहे. वाफेच्या इंजिनांपासून ते वंदे भारत ट्रेनच्या ट्रेन सेटपर्यंतचा हा प्रवास अगदी थक्क करणारा आहे. बदलत्या काळानुसार भारतीय रेल्वे अधिक अत्याधुनिक होत गेली. प्रवाशांसाठी आधुनिक सोयी, सुविधा, आरामदायी प्रवास तसेच सुरक्षितता यावर भारतीय रेल्वेने भर दिला आहे.