पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे मंगळवारी आरटीओ कार्यालयांमध्ये पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळाला. एरवी हजारो लोकांच्या गर्दीने आणि वाहनांच्या आवाजाने गजबजणाऱ्या आरटीओ परिसरात आज शुकशुकाट होता. मात्र, कामासाठी आलेल्या शेकडो नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
सकाळपासूनच आरटीओ कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार उघडे असले, तरी आतमध्ये कामाच्या खिडक्यांवर एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. परवाना विभाग, वाहन नोंदणी आणि कर संकलन विभाग या सर्वच ठिकाणी शुकशुकाट होता. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत काम बंदच राहील, असा पवित्रा कर्मचारी संघटनेने घेतला आहे. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. आज होणाऱ्या सर्व लर्निंग लायसन्स चाचणी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच नवीन वाहनांच्या नोंदणीचे काम रखडले आहे. संपाच्या एका दिवसामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Web Summary : A strike by employees has brought Pune RTO to a standstill, causing inconvenience to citizens. License tests and vehicle registrations are postponed indefinitely, resulting in significant revenue loss for the government.
Web Summary : कर्मचारियों की हड़ताल से पुणे आरटीओ में कामकाज ठप हो गया है, जिससे नागरिकों को असुविधा हो रही है। लाइसेंस परीक्षण और वाहन पंजीकरण अनिश्चित काल के लिए स्थगित कर दिए गए हैं, जिससे सरकार को भारी राजस्व नुकसान हो रहा है।