Video: पुण्यात निसर्गाचा चमत्कार....! दुर्मीळ पांढराशुभ्र गावकावळा ठरतोय आकर्षणाचे केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 18:03 IST2026-04-18T17:58:28+5:302026-04-18T18:03:41+5:30

- कावळा पांढरा दिसण्यामागील कारण म्हणजे 'ल्युसिजम' ही एक दुर्मीळ जैविक स्थिती होय.

pune newsvideo a miracle of nature in Pune The rare white village crow is becoming a center of attraction | Video: पुण्यात निसर्गाचा चमत्कार....! दुर्मीळ पांढराशुभ्र गावकावळा ठरतोय आकर्षणाचे केंद्र

Video: पुण्यात निसर्गाचा चमत्कार....! दुर्मीळ पांढराशुभ्र गावकावळा ठरतोय आकर्षणाचे केंद्र

कात्रज : कावळा तर प्रत्येकालाच माहीत आहे आणि बहुधा सर्वांनी तो पाहिलेलाही असतो; परंतु एक अत्यंत दुर्मीळ, संपूर्ण पांढऱ्या रंगाचा गावकावळा आढळून आलेला आहे. हा कावळा नेहमीप्रमाणे काळ्या रंगाच्या कावळ्यांच्या थव्यातच वावरताना दिसला. मात्र नेहमी पाहणाऱ्या त्याचा रंग हा आपण कावळ्याच्या रंगाप्रमाणे नसून, त्याच्या पूर्ण शुभ्र पांढऱ्या रंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.



पुणे शहरातील पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी हा कावळा पाहिला. त्यांनी तत्काळ याबाबत पक्षिप्रेमी बाळासाहेब ढमाले व निसर्ग अभ्यासक आकाश राऊत यांना ही माहिती दिली. त्यानंतर या दुर्मीळ कावळ्याचे निरीक्षण करण्यात आले. त्यानुसार त्यांनी अशी माहिती दिली की, कावळा पांढरा दिसण्यामागील कारण म्हणजे 'ल्युसिजम' ही एक दुर्मीळ जैविक स्थिती होय. सामान्यतः पक्ष्यांच्या शरीरात मेलेनिन नावाचे रंगद्रव्य तयार होत असते, ज्यामुळे त्यांच्या पिसांना काळा, तपकिरी किंवा इतर रंग प्राप्त होतो; परंतु जनुकांमधील बदल किंवा बिघाडामुळे जेव्हा हे रंगद्रव्य योग्य प्रमाणात तयार होत नाही, तेव्हा पक्ष्यांची पिसे पूर्णतः किंवा अंशतः पांढरी दिसू लागतात. या स्थितीला 'ल्युसिजम' असे म्हणतात.

महत्त्वाचे म्हणजे 'ल्युसिजम' आणि 'अल्बिनिझम' या दोन वेगळ्या स्थिती आहेत. अल्बिनिझममध्ये पक्ष्यांच्या डोळ्यांचा रंग लालसर दिसतो, तर ल्युसिजममध्ये डोळ्यांचा नैसर्गिक रंग कायम राहतो.  पुण्यात आढळलेला हा कावळा ल्युसिजमचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे पक्षिप्रेमी बाळासाहेब ढमाले व निसर्ग अभ्यासक आकाश राऊत यांनी सांगितले.

आकर्षणाचा बिंदू

शहरांमध्ये वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अशा निरीक्षणांमुळे निसर्ग संवर्धनाची गरज अधिक अधोरेखित होते. नागरिकांनी अशा दुर्मीळ पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी जागरूक राहणे आणि त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास न देणे अत्यंत गरजेचे आहे. पुण्यात आढळलेला हा 'शुभ्र गाव कावळा' निसर्गातील विविधतेचे जिवंत उदाहरण असून, निसर्गप्रेमी-अभ्यासकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

Web Title : पुणे में दुर्लभ सफेद कौआ: प्रकृति का अद्भुत नज़ारा

Web Summary : पुणे में ल्यूसिज्म के कारण एक दुर्लभ, पूरी तरह से सफेद कौआ देखा गया है, जो प्रकृति प्रेमियों को आकर्षित कर रहा है। एल्बिनिज्म के विपरीत, ल्यूसिज्म में आंखों का प्राकृतिक रंग बरकरार रहता है। विशेषज्ञ शहरी वातावरण में ऐसी अनूठी जैव विविधता के संरक्षण पर जोर देते हैं।

Web Title : Rare White Crow in Pune: Nature's Spectacle Attracts Attention

Web Summary : A rare, all-white crow, caused by leucism, has been spotted in Pune, attracting nature enthusiasts. Unlike albinism, leucism retains the natural eye color. Experts emphasize conserving such unique biodiversity in urban environments and avoiding disturbance to these rare birds.