अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची नोंदणी सोमवारपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 15:08 IST2026-05-10T15:08:10+5:302026-05-10T15:08:27+5:30

- राज्यात आतापर्यंत ७ लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी भरला प्रवेश अर्जाचा भाग एक

pune news registration for 11th online admission process from Monday | अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची नोंदणी सोमवारपासून

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची नोंदणी सोमवारपासून

पुणे : राज्य मंडळाने शुक्रवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला आहे. निकाल हाती आल्याने विद्यार्थी व पालक आता अकरावी प्रवेशाची धडपड करणार आहेत. दुसरीकडे शिक्षण विभागानेही शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला गती दिली असून, साेमवार (दि. ११) पासून https://mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवर अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ भरून नाेंदणी करता येणार आहे. माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ भरण्याची सुविधा महिनाभरापूर्वीच अर्थात दि. १० एप्रिल २०२६ पासून उपलब्ध करून दिली हाेती. यात आतापर्यंत एकूण ७ लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ भरुन नोंदणी केलेली आहे. साेमवारपासून प्रवेश प्रक्रियेचा भाग-१ आणि भाग-२ भरुन प्रवेश नोंदणी करता येणार आहे. या प्रक्रियेमध्ये तीन नियमित फेऱ्या हाेतील. चाैथी फेरी ओपन टू ऑल असेल. मुलींकरिता विशेष पाचवी फेरी घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी सदर पोर्टलवर उपलब्ध माहिती व सूचनेनुसार आपल्या प्रवेशासाठी ऑनलाइन पध्दतीने नोंदणी करावी, असे आवाहनही केले आहे.

शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे शून्य फेरी आणि नियमित कॅप फेरी १ चे वेळापत्रकही प्रसिद्ध केले आहे. विद्यार्थी/पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी अधिकृत पोर्टल-https://mahafyjcadmissions.in, ई-मेल आयडी support@mahafyjcadmissions.in आणि हेल्पलाईन नंबर ८५३०९५५५६४ याचा आधार घ्यावा, असे आवाहन देखील डाॅ. पालकर यांनी केले आहे.

-----------

...असा असेल शून्य फेरीचा कार्यक्रम

- दि. ८ ते १० मे : विद्यार्थी नोंदणी व अर्जाचा भाग १ ऑनलाइन सादर करणे.

- दि. ११ ते १३ मे : शैक्षणिक पात्रतेची माहिती भरून अर्जाचा भाग १ सादर करणे. विद्यार्थी एकाच वेळी भाग २ (कोटा) साठी ऑनलाइन अर्ज करू शकतो. (व्यवस्थापन / इन-हाऊस / अल्पसंख्याक कोट्यासाठी झिरो राउंड) तसेच विद्यार्थी किमान १ आणि कमाल १० कनिष्ठ महाविद्यालयांची प्राधान्ये भरू शकतो.

- दि. १४ व १५ मे : तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे

- दि. १६ मे : तात्पुरत्या गुणवत्ता यादीत हरकती / दुरुस्ती मागण्या असल्यास विद्यार्थी लॉगिनमधील "Grievance Redressal" द्वारे सादर करणे, संबंधित उपसंचालक शिक्षण यांच्या मार्फत हरकती / दुरुस्ती मागण्यांचे ऑनलाइन निवारण, संबंधित उपसंचालक शिक्षण यांच्याकडून तक्रार निवारण अंतिम करणे.

- दि. १८ व १९ मे : सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम करणे (एकदाच होणारी प्रक्रिया). व्यवस्थापन / इन-हाऊस / अल्पसंख्याक कोट्यासाठी झिरो राउंड वाटप.

- दि. १९ मे : अल्पसंख्याक, कोटा, इन-हाऊस व व्यवस्थापन कोट्यासाठी झिरो राउंड प्रवेशासाठी महाविद्यालयनिहाय यादी विभागाकडून दिली जाईल. रिक्त जागा प्रत्यार्पित करणे.

- दि. २० मे : रिक्त जागा प्रदर्शित करणे, पहिल्या फेरीकरिता जागा प्रदर्शित करणे (कोटा जागांसह). 

Web Title : ग्यारहवीं ऑनलाइन प्रवेश पंजीकरण सोमवार से शुरू: मुख्य विवरण

Web Summary : महाराष्ट्र में ग्यारहवीं कक्षा के लिए ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सोमवार से शुरू हो रही है। पंजीकरण mahafyjcadmissions.in पर खुला है। शून्य दौर का विवरण घोषित किया गया है। छात्र भाग 1 और 2 के लिए पंजीकरण कर सकते हैं। तीन नियमित दौर और लड़कियों के लिए एक विशेष दौर होगा।

Web Title : Eleventh Online Admission Registration Starts Monday: Key Details Inside

Web Summary : Maharashtra's eleventh-grade online admission process begins Monday. Registration is open on mahafyjcadmissions.in. Zero round details are announced. Students can register for part 1 and 2. There will be three regular rounds and a special round for girls.