शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: 'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:12 IST

Raj Thackeray Pune Visit: राज ठाकरे म्हणाले, छातीठोकपणे सांगतो, मी संघाचा कार्यकर्ता आहे असं म्हणताय, तर मग इथे कशाला टाईमपास करायला आलात? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा ...

पुणे : मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मतचोरीविरोधातील मोर्चात सहभाग घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आले. या बैठकीत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचे निर्देश दिले तसेच शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली.या बैठकीत मुळशी पॅटर्न फेम रमेश परदेशी यांना राज ठाकरेंनी खास करून सुनावल्याची चर्चा रंगली आहे. मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष असलेले परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आरएसएसच्या संचालनाचा फोटो पोस्ट केला. या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी त्यांना कार्यकर्त्यांसमोरच सुनावले. राज ठाकरे म्हणाले, छातीठोकपणे सांगतो, मी संघाचा कार्यकर्ता आहे असं म्हणताय, तर मग इथे कशाला टाईमपास करायला आलात? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा असेही ते म्हणाले. ठाकरेंच्या या फटकार्यानंतर सभागृहात काही काळ शांतता पसरली. कार्यकर्त्यांमध्ये मात्र यावरून मोठी चर्चा रंगली असून, राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पक्षातील शिस्त आणि निष्ठेबाबत कडक संदेश दिला असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या महायुतीच्या विरोधात लढा देणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये मनसे सहभागी होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. तसेच आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येऊन निवडणूक लढवतील, अशीही चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या मतचोरी विरोधातील लढाईत महाविकास आघाडीसह राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. मतचोरीच्या विरोधात मुंबईत काढलेल्या मोर्चात राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांसमवेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले. निवडणूक आयोगाने नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानंतर महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुण्यात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर तसेच शाखा अध्यक्षांबरोबर चर्चा केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Raj Thackeray rebukes party worker, emphasizes discipline and loyalty.

Web Summary : Raj Thackeray, after joining the anti-vote theft march, addressed party workers in Pune. He reprimanded a worker for RSS affiliation, stressing party loyalty. Thackeray hinted at potential alliances for upcoming elections, emphasizing the importance of discipline within the party amidst ongoing political discussions.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेElectionनिवडणूक 2024RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ