प्रवाशांचे हाल...! पुणे-दिल्ली स्पाईसजेट उड्डाणाला सहा तास विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 10:09 IST2026-04-17T10:08:45+5:302026-04-17T10:09:23+5:30

-तांत्रिक कारणांचा भडिमार; माहिती नसल्यामुळे प्रवासी त्रस्त

pune news passengers plight Pune-Delhi SpiceJet flight delayed by six hours | प्रवाशांचे हाल...! पुणे-दिल्ली स्पाईसजेट उड्डाणाला सहा तास विलंब

प्रवाशांचे हाल...! पुणे-दिल्ली स्पाईसजेट उड्डाणाला सहा तास विलंब

पुणे :पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीकडे जाणाऱ्या स्पाईसजेटच्या सकाळच्या उड्डाणाला सलग तिसऱ्या दिवशी मोठा विलंब झाला. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गुरुवारी तर या विमानाला तब्बल सहा तास उशीर झाल्यामुळे कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

पुण्यातून स्पाईसजेटचे एसजी-९३७ हे विमान दररोज पहाटे ५:५५ वाजता दिल्लीकडे उड्डाण करते. दिल्लीला अडीच तासांत पोहोचणारे हे उड्डाण कार्यालयीन कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. सकाळी लवकर पोहोचण्याच्या सोयीमुळे अनेक जण याच विमानाची निवड करतात. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून या उड्डाणाचा खोळंबा होत आहे. गुरुवारी पहाटे चार वाजताच अनेक प्रवासी विमानतळावर दाखल झाले होते. 

नियोजित वेळ उलटूनही विमान उड्डाण करत नसल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे, विमान नेमके कधी सुटणार, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात येत नसल्याची प्रवाशांची तक्रार होती. विमानतळावरील कर्मचाऱ्यांकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. या विमानात सुमारे १२० हून अधिक प्रवासी होते.

बराच वेळ उलटून गेल्यानंतर प्रवाशांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतरच तांत्रिक बिघाडामुळे उशीर होत असल्याचे सांगण्यात आले. याआधी बुधवारीही या उड्डाणाला जवळपास तीन तास विलंब झाला होता. सलग तिसऱ्या दिवशी तांत्रिक कारणांचा दाखला दिला जात असला तरी, यामागे नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. काही प्रवाशांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केल्यानंतर विमान कंपनीकडून तिकीट रद्द करून परतावा घेण्याचा किंवा पुढील दिवशीचे उड्डाण स्वीकारण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

Web Title : यात्रियों का बुरा हाल: पुणे-दिल्ली स्पाइसजेट उड़ान छह घंटे लेट

Web Summary : पुणे-दिल्ली स्पाइसजेट की उड़ान लगातार तीसरे दिन छह घंटे देरी से हुई, जिससे यात्रियों को भारी असुविधा हुई। तकनीकी खराबी बताई गई, लेकिन यात्रियों को खराब योजना का संदेह है। रिफंड या पुनर्निर्धारण के विकल्प दिए गए।

Web Title : Travelers Stranded: Pune-Delhi SpiceJet Flight Delayed by Six Hours

Web Summary : SpiceJet's Pune-Delhi flight faced six-hour delays for the third consecutive day, causing significant inconvenience to passengers. Technical issues were cited, but passengers suspect poor planning. Options offered include refunds or rescheduling.