शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरात ‘कागदी’ वन्यप्राणी गणना ? ६ हजार हेक्टरमध्ये फक्त १४७ प्राणी; अहवालावर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 17:38 IST

वनकर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष गणना न करता ‘कागदी घोडे’ नाचवत अहवाल सादर केल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सुमारे ६ हजार १३६ हेक्टर वनक्षेत्रात केवळ १४७ वन्यप्राणी असल्याची नोंद यंदाच्या बौद्ध पौर्णिमेच्या रात्री करण्यात आलेल्या वन्यप्राणी गणनेत झाली आहे. मात्र, या आकडेवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, वनकर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष गणना न करता ‘कागदी घोडे’ नाचवत अहवाल सादर केल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाश मुबलक असल्याने आणि उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत कमी असल्यामुळे पाणवठ्यांवर येणाऱ्या वन्यप्राण्यांची गणना करणे सोयीचे ठरते. त्यामुळे या दिवशी वन्यप्राणी गणना केली जाते. यंदाही १ मे रोजी गणना करण्यात आली.

इंदापूर, जंक्शन आणि भिगवण येथील वनपालांनी ४ मे रोजी सादर केलेल्या माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर यांनी पुणे येथील उपवनसंरक्षकांकडे अहवाल पाठवला. या अहवालानुसार, एकूण १४७ वन्यप्राणी आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये चिंकारा हरणांची संख्या सर्वाधिक ११७ असून, ससे १७ इतके आहेत. उर्वरित प्राण्यांची संख्या एक आकडीच आहे.

मात्र, ६३ गावांमध्ये पसरलेल्या एवढ्या मोठ्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची संख्या इतकी कमी असणे संशयास्पद वाटत आहे. “सर्व वन्यप्राणी एकाच वेळी दिसणार नाहीत, ही वस्तुस्थिती असली तरी संख्या इतकी कमी कशी?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

यंदा महाराष्ट्र दिन आणि बौद्ध पौर्णिमा एकाच दिवशी आल्याने शासकीय सुट्टीचा लाभ घेत काही वनकर्मचाऱ्यांनी रात्रीच्या गणनेला दांडी मारली आणि प्रत्यक्ष पाहणी न करता अहवाल तयार केला असावा, अशीही चर्चा रंगली आहे.

यासंदर्भात गणनेदरम्यान किती पाणवठ्यांवर कर्मचारी नेमले होते, सीसीटीव्हीचा वापर झाला का, अशी माहिती विचारली असता, वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर यांनी “सीसीटीव्ही बसवले नव्हते, त्यामुळे फोटो उपलब्ध नाहीत,” असे सांगितले. मात्र, इतर तपशील देण्यास त्यांनी टाळाटाळ केली.

दरम्यान, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ४ मेपर्यंत वनपरिक्षेत्र अधिकारी रजेवर असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेवर अधिकच संशय व्यक्त केला जात आहे.

..................................

गणनेतील प्राणी संख्या पुढीलप्रमाणे :

चिंकारा – ११७, ससे – १७, लांडगे – ४, खोकड – ३, काळवीट – २, मोर – २, तरस – १, मुंगूस – १ (एकूण १४७)

सखोल चौकशीची मागणी

विशेष म्हणजे, इंदापूर तालुक्यात गेल्या दहा वर्षात २०२१ चा अपवाद वगळता आजतागायत कागदोपत्रीच प्राणी गणना होत आहे, अशी कबुली नाव न छापण्याच्या अटीवर येथून बदलून गेलेल्या अधिकाऱ्याने दिली. या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणनेची सखोल चौकशी होणार का, आणि वस्तुस्थिती समोर येणार का, याकडे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indapur Wildlife Census: Suspicion over low animal count, paper report?

Web Summary : Doubts arise over Indapur's wildlife census. Only 147 animals recorded in 6,000 hectares. Officials suspect fabricated report due to low numbers and procedural lapses. Inquiry demanded.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAnimalप्राणीforestजंगलforest departmentवनविभाग