समाविष्ट गावांत मिळकतकराचा महाघोटाळा; उद्धवसेनेचे शहरप्रमुख वसंत मोरे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 17:02 IST2026-05-06T16:58:48+5:302026-05-06T17:02:24+5:30

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मिळकतकराच्या नावाखाली शेकडो कोटींचा महाघोटाळा झाला

pune news massive property tax scam in included villages; Uddhav Sena city chief Vasant More alleges | समाविष्ट गावांत मिळकतकराचा महाघोटाळा; उद्धवसेनेचे शहरप्रमुख वसंत मोरे यांचा आरोप

समाविष्ट गावांत मिळकतकराचा महाघोटाळा; उद्धवसेनेचे शहरप्रमुख वसंत मोरे यांचा आरोप

पुणे : महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये मिळकतकराच्या नावाखाली शेकडो कोटींचा महाघोटाळा झाला आहे. प्रत्यक्ष जमिनीवर साधी वीटही रचलेली नसताना कागदोपत्री टोलेजंग इमारती आणि रो-हाऊस दाखवले आहेत. या माध्यमातून भविष्यात बांधकाम करताना लागणारे कोट्यवधींचे डेव्हलपमेंट चार्जेस (बांधकाम शुल्क) वाचवून महापालिकेचे नुकसान करण्याचा डाव असल्याचा आरोप उद्धवसेनेचे शहरप्रमुख वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

मोरे म्हणाले, महापालिकेत २०२१-२२ दरम्यान काही गावांचा समावेश झाला. गुजरवाडी-निंबाळकरवाडी हे गाव पालिकेत येणार याची कुणकुण लागताच, काही ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि महापालिकेच्या कर विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून मिळकत कर आकारणीचा महाघोटाळा केला आहे. भविष्यात बांधकाम करताना लागणारे बांधकाम शुल्क वाचवण्यासाठी आणि अनधिकृत बांधकामावर लागणारा तीनपट दंड टाळण्यासाठी रिकाम्या जागेवर कागदोपत्री इमारती आणि रो-हाऊस दाखवण्यात आले आहेत.

सोपान काका नगर भागात एका इमारतीत ३० फ्लॅट दाखवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात तिथे फक्त पार्किंगचे शेड असून इमारत अस्तित्वातच नाही. तरीही या बोगस फ्लॅट्सवर पालिकेचा टॅक्स आकारला जात आहे. थकबाकी दाखवून कागदोपत्री घोडे नाचवले जात असल्याचा आरोप मोरेंनी केला आहे.

Web Title : विलय किए गांवों में संपत्ति कर का घोटाला: उद्धव सेना का आरोप

Web Summary : उद्धव सेना के वसंत मोरे ने पुणे के पास विलय किए गए गांवों में संपत्ति कर घोटाले का आरोप लगाया। विकास शुल्क से बचने के लिए खाली भूखंडों को कागजों पर इमारतें दिखाया गया, जिससे नगर निगम को भारी नुकसान हुआ। मोरे का दावा है कि बिना अस्तित्व के नकली फ्लैटों पर कर लगाया जा रहा है।

Web Title : Massive Property Tax Scam in Merged Villages, Alleges Uddhav Sena Leader

Web Summary : Uddhav Sena's Vasant More alleges a massive property tax scam in newly merged villages near Pune. Empty plots are shown as buildings on paper to evade development charges, causing huge losses to the Municipal Corporation. Bogus flats are taxed despite non-existence, claims More.