- हिरा सरवदे
पुणे : वडगाव खुर्द येथील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) आरएमसी प्रकल्पांवर शुक्रवारी पहाटे नियोजित केलेली कारवाई गुरुवारी रात्री उशीरा अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारवाईला विरोध केल्याप्रकरणी नगरसेविकेच्या पतीविरोधात पोलिस तक्रार करणारे महापालिका प्रशासन एका आमदाराच्या दबावाखाली मात्र झुकल्याचे समोर आले आहे.
नागरिकांच्या आरोग्य व पर्यावरणावर विपरीत परिणाम करणाऱ्या आरएमसी प्रकल्पाच्या उपद्व्यापाची वृत्त मालिका 'लोकमत'ने प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेला जाग आली. बुधवारी सकाळी लोहगाव - खांदवे नगरमधील ७आरएमसी प्रकल्प जमीनदोस्त केले. या कारवाईत भाजपच्या एका नगरसेविकेच्या पतीने आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला, त्यांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात धमकावल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली.
या कारवाईनंतर शहरातील शहरातील वडगाव खुर्द (जुने गावठाण), धायरी, बावधन, उंड्री शेवाळवाडी या परिसरातीलही आरएमसी प्रकल्पांवर अशाच प्रकारे प्रभावी कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी छातीठोकपणे सांगितले होते. कोणत्या भागात कधी कारवाई करायची, याचे नियोजनही करण्यात आले होते. या नियोजनानुसार वडगाव खुर्द येथील नदीकिनारी व परिसरात असलेल्या आरएमसी प्रकल्पांवर शुक्रवारी पहाटे कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
मात्र, या कारवाईची कुण कुण प्रकल्प मालकांना लागली. येथील एक प्रकल्प शहरातील एका आमदाराच्या नातेवाईकाचा आहे. त्यामुळे या आमदाराने आपले राजकीय वजन वापरत प्रशासनावर दबा आणला. या दबावाला बळी पडून प्रशासनाने पहाटेची कारवाई रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी रात्री उशिरा घेतला. कारवाई रद्द झाल्याचे निरोप कारवाईत सहभाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना व यंत्रणेला देण्यात आला.यावरून नगरसेविकेच्या पतीच्या विरोधात आक्रमक भुमीका घेणारे महापालिका प्रशासन आमदारांच्या दबावाखाली झुकल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदाराच्या नातेवाईकासाठी महापालिका प्रशासन सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.बांधकाम विभागाने अंग काढून घेतले
शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिकेच्या बांधकाम विभागाचे आहे. या कारवाईला अतिक्रमण विभाग मदत करतो. त्यामुळे आरएमसी प्रकल्पांवर बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभाग संयुक्तपणे कारवाई करावी, असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले होते. कारवाई वेळी महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही उपस्थित राहतील, असे सांगण्यात आले होते.
मात्र लोहगाव येथील कारवाईच्या 3 वेळी बांधकाम विभागाचे अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी अनुपस्थित राहिले. ही कारवाई अतिक्रमण विभागाने सुरक्षारक्षकांच्या व इतर यंत्रसामग्रीच्या साह्याने केली.वडगाव येथील कारवाईच्या संदर्भात महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना विचारले असता, त्यांनी कारवाई करण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागाची असल्याचे सांगत कारवाईतून अंग काढून घेतले.
Web Summary : Pune's RMC project demolition halted after MLA intervention, raising concerns about public health versus political influence. Officials cite encroachment department responsibility, avoiding involvement. Earlier action saw police complaint against corporator's husband.
Web Summary : पुणे में विधायक के हस्तक्षेप के बाद आरएमसी परियोजना का विध्वंस रोका गया, जिससे सार्वजनिक स्वास्थ्य बनाम राजनीतिक प्रभाव को लेकर चिंताएं बढ़ गईं। अधिकारियों ने अतिक्रमण विभाग की जिम्मेदारी बताई, शामिल होने से परहेज किया। पहले की कार्रवाई में पार्षद के पति के खिलाफ पुलिस शिकायत दर्ज कराई गई थी।