Video : काय सापडले धागेदोरे? पहाटे ‘३ वाजता’ आरोपीला घेऊन पोलीस घटनास्थळी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 20:40 IST2026-05-06T20:39:10+5:302026-05-06T20:40:56+5:30

Pune Nasrapur Case : आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पुरावे भक्कम करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

Pune Nasrapur Case What clues were found? The police arrived at the scene at 3 am with the accused. | Video : काय सापडले धागेदोरे? पहाटे ‘३ वाजता’ आरोपीला घेऊन पोलीस घटनास्थळी दाखल

Video : काय सापडले धागेदोरे? पहाटे ‘३ वाजता’ आरोपीला घेऊन पोलीस घटनास्थळी दाखल

नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्यंत गंभीर अत्याचार व खून प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला असून, या प्रकरणाच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी झपाट्याने हालचाली सुरू केल्या आहेत. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पुरावे भक्कम करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.



मंगळवारी रात्री उशिरा, पहाटे सुमारे ३ वाजल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला सोबत घेऊन घटनास्थळाची सखोल पाहणी करण्यात आली. या पाहणीत तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलीस अधीक्षकांनी स्वतः उपस्थित राहून तपास पथकाला आवश्यक सूचना दिल्या.

या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञ, डॉग स्कॉड आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्येक बाजू तपासली जात आहे.

तपासाची गती लक्षात घेता, येत्या १५ दिवसांत जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे न्यायप्रक्रिया लवकर सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेमुळे नसरापूर आणि भोर तालुक्यात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून दोषीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे, मात्र नागरिकांमध्ये न्यायाबाबतचा विश्वास काही प्रमाणात दृढ झाला आहे.  

Web Title : नसरापुर अपराध: पुलिस को मिले सुराग, आरोपी के साथ घटनास्थल पर दोबारा पहुँची

Web Summary : नसरापुर में जघन्य अपराध की पुलिस तेजी से जांच कर रही है, आरोपी को लेकर सुबह 3 बजे घटनास्थल का दौरा किया। महत्वपूर्ण सुराग मिले। एक विशेष टीम नियुक्त, 15 दिनों में चार्जशीट दाखिल होगी। जनता में गुस्सा और डर है।

Web Title : Nasrapur Crime: Police find clues, revisit scene with accused at 3AM.

Web Summary : Police swiftly investigate the heinous crime in Nasrapur, revisiting the scene with the accused at 3 AM. Crucial clues were discovered. A special team is appointed, and a charge sheet will be filed within 15 days. Public anger and fear are palpable.