शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेमुळे पुणेकर हैराण..! पुण्यासह राज्यामध्ये उन्हाचा पारा वाढला; दिवसरात्र उकाडा

By श्रीकिशन काळे | Updated: March 15, 2025 16:33 IST

पुण्यासह राज्यामध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. बहुतांशी भागात दुपारचे तापमान चाळीशी पार गेले आहे.

पुणे : पुणे शहर आता चांगलेच तापू लागले असून, पुणेकर उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. सूर्यनारायण आग ओकत असून, दिवसा तापमानाचा पारा चाळीशीत पोचत आहे, तर रात्रीचे तापमानही वाढत आहे. परिणामी यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरत असल्याचे चिन्ह आताच दिसू लागले आहे.  सध्या उन्हामुळे दुपारी घराबाहेर जाणे देखील अवघड होत आहे. उन्हात गेल्याने अंगाची लाही लाही होत आहे. पुण्यासह राज्यामध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. बहुतांशी भागात दुपारचे तापमान चाळीशी पार गेले आहे. रात्रीचे तापमानही वाढत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हवामान विभागाने विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भात उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. राज्यामध्ये रविवारी (दि.१६) यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तर अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, नागूपर, वर्धा, यवतमाळ, मालेगाव आणि सोलापूर जिल्ह्यात तापमान ४० अंशाच्या पार पोचले आहे. दरम्यान, राज्यातील तापमानातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे, अंगात पांढरे कपडे परिधान करावेत, जेणेकरून उन्हाचा चटका अधिक बसणार नाही, असा सल्ला जाणकारांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडweatherहवामान अंदाजHeat Strokeउष्माघात