LPG Gas Cylinder: पुण्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 09:54 IST2026-03-13T09:54:10+5:302026-03-13T09:54:53+5:30

पुणे जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक तसेच तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे

Pune has sufficient stock of gas cylinders; District Collector appeals to citizens not to believe rumors | LPG Gas Cylinder: पुण्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

LPG Gas Cylinder: पुण्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

पुणे : युद्धाच्या परिणामामुळे शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होण्याच्या शक्यतेने नागरिक पॅनिक झाले असून, गॅस सिलिंडर संपण्याच्या भीतीने नागरिक आगाऊ साठवणूक करत आहेत. बुकिंग नसतानाही अनेक जण दुकानासमोर उभे राहत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून, नेहमीपेक्षा गॅस सिलिंडरच्या बुकिंगमध्ये चौपटीने वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा दिसून येत आहेत. यावरून पुणेजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. पुणे जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी सांगितले आहे. 

जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक तसेच तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांना नियमितपणे गॅस सिलेंडरचा पुरवठा होत असून कोणतीही टंचाई निर्माण झालेली नाही. जिल्हा प्रशासन व जिल्हा पुरवठा विभागामार्फत सर्व गॅस एजन्सींवर सतत देखरेख ठेवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय फिरती व दक्षता पथके गठित करण्यात आली आहेत. कोणत्याही वितरकाकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने विक्री करणे किंवा इतर अनियमितता आढळल्यास संबंधितांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच हॉस्पिटलसारख्या अत्यावश्यक सेवांना तसेच विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहांना गॅस सिलेंडरचा पुरवठा प्राधान्याने करण्यात यावा, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

Web Title : पुणे में एलपीजी गैस सिलेंडर पर्याप्त; अफवाहों पर विश्वास न करें: कलेक्टर

Web Summary : पुणे में एलपीजी सिलेंडर का पर्याप्त भंडार है; आपूर्ति नियमित है। कलेक्टर नागरिकों से अफवाहों पर ध्यान न देने का आग्रह करते हैं, वितरकों द्वारा कृत्रिम कमी या अधिक कीमत वसूलने पर सख्त कार्रवाई का आश्वासन देते हैं। अस्पतालों और छात्र छात्रावासों के लिए प्राथमिकता आपूर्ति सुनिश्चित की गई है।

Web Title : Pune has sufficient LPG; Don't believe rumors, says Collector.

Web Summary : Pune has ample LPG cylinder stock; supply is regular. Collector urges citizens to ignore rumors, assuring strict action against artificial scarcity or overpricing by distributors. Priority supply for hospitals and student hostels is ensured.