शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दोन ठिकाणी आगीच्या घटना; जीवितहानी टळली, अग्निशमन दलाची तत्काळ कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 10:08 IST

पहिली घटना पुण्यातील प्रसिद्ध श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराजवळ घडली.

पुणेपुण्यात आज पहाटे दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या असून सुदैवाने दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पहिली घटना पुण्यातील प्रसिद्ध श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराजवळ घडली.अधिकच्या माहितीनुसार, रात्री १.०६ वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळताच तत्काळ १० अग्निशमन वाहने, ५ अधिकारी आणि ५० जवान घटनास्थळी रवाना झाले. मंदिराशेजारी असणाऱ्या एका दुमजली लाकडी वाड्याला भीषण आग लागली असून खाली असलेल्या दोन दुकानांनाही या आगीत नुकसान झाले आहे.अग्निशमन दलाच्या जवानांनी चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवला. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वेळीच ८-१० नागरिक बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिस आणि महावितरणचे कर्मचारीही घटनास्थळी हजर आहेत.तर दुसरी घटना चंदननगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी परिसरात पहाटे ५ वाजता घडली. येथे लागलेल्या भीषण आगीत जवळपास ५० हून अधिक झोपड्या भस्मसात झाल्या असून १० पेक्षा अधिक गॅस सिलेंडर फुटल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या आणि अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली ८० जवानांनी आग आटोक्यात आणली. घटनास्थळी १०० हून अधिक सिलेंडर्स बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेतही कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दोन्ही ठिकाणी आग नियंत्रणात असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाकडून पुढील तपास व मदतकार्य सुरू आहे.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfireआगFire Brigadeअग्निशमन दल