शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आता नवा घोळ ! पुण्यात आता कोरोनाच्या ४४ हजार लसींचा हिशेबच लागेना.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 21:15 IST

खासगी लसीकरण केंद्राकडून माहिती भरण्यास टाळाटाळ : प्रत्येक दिवशी लसीकरणाची माहिती अद्ययावत करण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना.

निनाद देशमुख  जिल्ह्यात १६ तारखेपासून कोरोना लसीकरण सुरू झाले. जिल्ह्यात लसीकरणासाठी आतापर्यंत कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशिल्डचे दीड लाख डोस मिळाले. यातील १ लाख ८ हजार ५५६ डोस देण्यात आले आहे. मात्र, काही खासगी लसीकरण केंद्राने वेळोवेळी लसीकरणाची माहिती जिल्हा आरोग्य विभागाला न दिल्यामुळे, तसेच समन्वय न ठेवल्यामुळे जवळपास ४४ हजार ९४४ डोसचा हिशेब लागत नसल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे काही खासगी लसीकरण केंद्रांकडून पुन्हा लसीकरणाची माहिती मागवण्यात येत असून, रोजच्या रोज किती लसीकरण झाले याची माहिती अद्ययावत करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाने या खासगी केंद्रांना दिले आहे.         जिल्ह्यात जवळपास ११४ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. तर, ५५ केंद्र हे खासगी लसीकरणासाठी निवडण्यात आले होते. यातील २५ केंद्रांवर सध्या लसीकरण सुरू आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच, फ्रन्ट लाईन वर्कर यांचे लसीकरण आधी करण्यात आले. १६ जानेवारीपासून या कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वयोगटांतील सहव्याधी असलेल्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार ४९१ वृद्ध व्यक्तींना, तर ४५ ते ५९ वयोगटांतील सहव्याधी असलेल्या ५ हजार १६१ जणांनाचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी १ लाख ५३ हजार ५०० डोस मिळाले होते. त्या पैकी १ लाख ८ हजार ५५६ जणांना लस दिली गेली.    लसीकरण झाल्यावर दिवसभरात किती डोस देण्यात आले, याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना आरोग्य विभगाने सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही खासगी केंद्रांकडून ही माहिती रोजच्या रोज अद्ययावत होत नसल्याने रोज किती डोस दिले गेले, याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली नाही. ही माहिती न मिळाल्याने ४४ हजार ९४४ डोसेसचा हिशेब आरोग्य विभागाला लागत नसल्याने पुन्हा या केंद्राकडून ही माहिती घेतली जात आहे. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना रोज देणे गरजेचे आहे. यासाठी त्यांच्याशी समन्वय ठेवणे गरजेचे असताना रोजच्या लसीकरणाबाबत समन्वय होत नसल्याने माहिती अद्ययावत होत नाही.       आरोग्य विभागाने याची गंभीरपणे दखल घेतली असून, लसीकरणाची माहिती रोजच्या रोज अद्ययावत करून तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना द्यायला सांगितली आहे. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला रोज देणार आहे.. दरम्यान याविषयी विचारल्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले ," जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि काही खासगी केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. लसीकरणाची सर्व माहिती रोजच्या रोज अद्ययावत होणे गरजेचे आहे. मात्र, काही खासगी केंद्रांवर समन्वय नसल्याने ही माहिती रोज अद्ययावत होत नसल्याने लसीकरणात तफावत आढळत आहेत. यामुळे या केंद्रांना लसीकरणाची माहिती रोज अद्ययावत करण्यास सांगण्यात आले आहे"

 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस