Pune Crime: प्रेम संबंध, फसवणूक, बॅटने मारहाण ..; सेक्रेटरीचा भाजप पदाधिकाऱ्यासह पत्नी अन् लेकीने असा काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 12:52 IST2026-04-18T12:49:48+5:302026-04-18T12:52:25+5:30

Pune Crime - पाेत्यात मृतदेह ठेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

Pune CrimeLove affair, cheating, beating with bat...; BJP office bearer's wife and daughter share this story | Pune Crime: प्रेम संबंध, फसवणूक, बॅटने मारहाण ..; सेक्रेटरीचा भाजप पदाधिकाऱ्यासह पत्नी अन् लेकीने असा काढला काटा

Pune Crime: प्रेम संबंध, फसवणूक, बॅटने मारहाण ..; सेक्रेटरीचा भाजप पदाधिकाऱ्यासह पत्नी अन् लेकीने असा काढला काटा

पुणे :  अनैतिक संबंधातून महिलेला बॅटने मारहाण करून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना चंदननगर भागात घडली. या प्रकरणी एका वकिलासह त्याची पत्नी आणि मुलीला अटक करण्यात आली आहे. पूनम दिनेश मुन (वय ३२, रा. गणेशनगर, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी वकील ॲड. संजय सावंत, त्यांची पत्नी स्वाती आणि मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पूनमचे पती दिनेश यांनी फिर्याद दिली असून, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी दिली.

ॲड. सावंत यांचे पूनमशी प्रेमसंबंध होते. ॲड. सावंत यांचे चंदननगर भागातील जुन्या मुंढवा रस्त्यावर कार्यालय आहे. पूनम गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. सावंत यांच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून काम करत होती. गुरुवारी (दि. १६) सकाळी ती नेहमीप्रमाणे ॲड. सावंत यांच्या कार्यालयात गेली. त्यानंतर ॲड. सावंत, त्यांची पत्नी स्वाती आणि मुलीने तिला बॅटने मारहाण केली.

तिच्यावर शस्त्राने वार करण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात ठेवण्यात आला. रात्री आठपर्यंत पूनम घरी न परतल्याने तिच्या पतीने ॲड. सावंत यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा पूनम मैत्रिणीकडे गेल्याचे सांगण्यात आले. पतीने तिच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला; मात्र मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पूनमचे पती शुक्रवारी सकाळी ॲड. सावंत यांच्या कार्यालयात गेले. तेव्हा कार्यालयाचा दरवाजा उघडा होता. पूनम रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिचा मृतदेह तेथेच ठेवण्यात आला होता. त्यानंतर पूनमच्या पतीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, नूतन पवार, तसेच पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

चंदननगर पोलिसांनी ॲड. सावंत आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले, तसेच गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ॲड. सावंत यांची पत्नी स्वाती हिला ताब्यात घेतले. खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सहा तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात आला. पोलीस निरीक्षक बडाख, खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने आणि पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

Web Title : पुणे: प्रेम संबंध, धोखा, हत्या! वकील, पत्नी, बेटी ने सेक्रेटरी को मारा

Web Summary : पुणे में प्रेम संबंध के चलते एक महिला की हत्या कर दी गई। एक वकील, उसकी पत्नी और बेटी को उसके कार्यालय में पीट-पीट कर मारने के आरोप में गिरफ्तार किया गया है। पीड़िता उसकी सहायक के रूप में काम करती थी। पुलिस ने तुरंत मामला सुलझा लिया।

Web Title : Pune: Affair, Deceit, Murder! Secretary Killed by Lawyer, Wife, Daughter

Web Summary : In Pune, a woman was murdered over an affair. A lawyer, his wife, and daughter are arrested for beating her to death at his office. The victim worked as his assistant. Police quickly solved the case.