व्हॉट्सॲप ग्रुपमधून  बाहेर का काढलं ? एवढंच विचारलं अन्... थेट मारहाण ५ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 17:15 IST2026-05-10T17:14:38+5:302026-05-10T17:15:02+5:30

जाब विचारण्यासाठी त्या आरोपींकडे गेल्या असता, त्यांना शिवीगाळ करत बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे

pune crime why were you removed from the WhatsApp group? I just asked and 5 people were charged with assault | व्हॉट्सॲप ग्रुपमधून  बाहेर का काढलं ? एवढंच विचारलं अन्... थेट मारहाण ५ जणांवर गुन्हा

व्हॉट्सॲप ग्रुपमधून  बाहेर का काढलं ? एवढंच विचारलं अन्... थेट मारहाण ५ जणांवर गुन्हा

पुणे : व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला शेजाऱ्यांकडून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याचा प्रकार धानोरी परिसरात घडला आहे. याप्रकरणी गिनीबेलव्हिस्टा सोसायटीत राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सूरज पांडे (वय ४०), मोनिका पांडे (वय ४०) तसेच सूरज पांडे यांची आई, मामा आणि मामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ मे रोजी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे धानोरी परिसरातील गिनीबेलव्हिस्टा सोसायटी, डी. एन. परांडे पार्क येथे राहतात. फिर्यादी महिलेला सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून सूरज पांडे यांनी बाहेर काढले होते.

याचा जाब विचारण्यासाठी त्या आरोपींकडे गेल्या असता, त्यांना शिवीगाळ करत बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लाखे करत आहेत.

Web Title : व्हाट्सएप ग्रुप से निकालने पर सवाल, पुणे में पांच लोगों पर मामला दर्ज।

Web Summary : पुणे में एक महिला को व्हाट्सएप ग्रुप से निकालने पर सवाल करने पर पड़ोसियों ने कथित तौर पर हमला कर दिया। पुलिस ने धानोरी में हुई घटना के बाद एक व्यक्ति, उसकी माँ, उसकी पत्नी और उसके चाचा-चाची सहित पाँच लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : WhatsApp exit question leads to assault; five booked in Pune.

Web Summary : A woman in Pune was allegedly assaulted by neighbors for questioning her removal from a WhatsApp group. Police have registered a case against five individuals, including a man, his mother, his wife, and his aunt and uncle, following the incident in Dhanori.