पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एका ६५ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावर शुक्रवारी (दि.१) रात्री आंदोलन केले. त्यानंतर शनिवारी ग्रामस्थांनी माेर्चा काढून बंद पुकारला.भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर एका गोठ्यात अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने बालिकेला दगडाने ठेचून मारले. आरोपीने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पुरल्याचे उघडकीस आल्यानंतर संतप्त पडसाद उमटले. या भागातील नागरिकांनी पुणे-सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर ग्रामस्थांनी राजगड पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीला ताब्यात घेतले.
Web Summary : A 3.5-year-old girl was brutally murdered in Nasrapur. Police arrested a 65-year-old. Villagers protested, demanding justice. The accused sexually assaulted and killed the child by crushing her with a stone, then hid the body. Police are investigating the heinous crime.
Web Summary : नसरापुर में एक 3.5 वर्षीय बच्ची की बेरहमी से हत्या कर दी गई। पुलिस ने 65 वर्षीय व्यक्ति को गिरफ्तार किया। ग्रामीणों ने विरोध प्रदर्शन कर न्याय की मांग की। आरोपी ने बच्ची के साथ यौन उत्पीड़न किया और पत्थर से कुचलकर उसकी हत्या कर दी, फिर शव को छिपा दिया। पुलिस जघन्य अपराध की जांच कर रही है।