सिंहगडावर नेमकं काय घडलं..? २८ वर्षीय तरुणीचा मृतदेह २ दिवसांनी खोल दरीत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 16:43 IST2026-05-01T16:40:59+5:302026-05-01T16:43:58+5:30

Pune Crime - मनीषाची बॅग, मोबाईल आणि इतर साहित्य परिसरात आढळून आल्याने कुटुंबीयांनी हवेली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

Pune Crime What really happened at Sinhagad? The body of a 28-year-old girl was found in a deep valley after 2 days. | सिंहगडावर नेमकं काय घडलं..? २८ वर्षीय तरुणीचा मृतदेह २ दिवसांनी खोल दरीत सापडला

सिंहगडावर नेमकं काय घडलं..? २८ वर्षीय तरुणीचा मृतदेह २ दिवसांनी खोल दरीत सापडला

धायरी : पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ला परिसरातून बेपत्ता झालेल्या २८ वर्षीय तरुणीचा मृतदेह अखेर खोल दरीत आढळून आला. दोन दिवस सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाने रॅपलिंगच्या सहाय्याने दरीत उतरून मृतदेह बाहेर काढला. या घटनेमुळे सिंहगड परिसरात खळबळ उडाली आहे.

अधिकच्या माहितीनुसार, मनीषा धर्मदास गायकवाड (वय २८) असे मृत तरुणीचे नाव असून, ती मूळच्या नांदेड जिल्ह्यातील धेनेगाव येथील रहिवासी होती. सध्या ती चिंचवडमधील बिजलीनगर परिसरात वास्तव्यास होती. मनीषाने बीई इलेक्ट्रिकलचे शिक्षण पूर्ण केले होते. २९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी मनीषा सिंहगड परिसरात गेल्यानंतर बेपत्ता झाली. किल्ला परिसरात मनीषाची बॅग, मोबाईल आणि इतर साहित्य आढळून आल्याने कुटुंबीयांनी हवेली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, गड परिसरातील काही स्थानिकांनी सायंकाळच्या वेळी दरीत कुणीतरी पडल्याचा आवाज ऐकल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर हवेली पोलीस, सिंहगड वनविभाग, अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली. सलग दोन दिवस चाललेल्या  शोधकार्यानंतर अखेर आपत्ती व्यवस्थापन पथकाला खोल दरीत मनीषाचा मृतदेह आढळून आला. दोराच्या सहाय्याने, कठीण परिस्थितीत रॅपलिंग करत पथकाने मृतदेह बाहेर काढला. मनीषाने किल्ल्याच्या बुरुजावरून दरीत उडी घेत आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, तिने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हवेली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title : सिंहगढ़ में हादसा: खोज के बाद घाटी में महिला का शव मिला

Web Summary : सिंहगढ़ किले के पास एक 28 वर्षीय महिला, मनीषा गायकवाड़, दो दिन की खोज के बाद एक घाटी में मृत पाई गईं। वह 29 अप्रैल को लापता हो गई थी। पुलिस मौत के कारणों की जांच कर रही है, आत्महत्या का संदेह है।

Web Title : Tragedy at Sinhagad: Woman's Body Found in Valley After Search

Web Summary : A 28-year-old woman, Manisha Gaikwad, was found dead in a valley near Sinhagad fort after a two-day search. She went missing on April 29th. Police are investigating the cause of death, suspecting suicide.