Pune crime : प्रेमासाठी मुलाचाच ‘काटा काढला’; आई-प्रियकराचा थरकाप उडवणारा कट उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 12:38 IST2026-04-19T12:37:58+5:302026-04-19T12:38:45+5:30

Pune crime - बसरिनचे शेजारी राहणाऱ्या राम कजेवाड याच्याशी तिचे सूत जुळले होते.

Pune crime Sacrificing a child for love; Mother-lover's shocking plot exposed | Pune crime : प्रेमासाठी मुलाचाच ‘काटा काढला’; आई-प्रियकराचा थरकाप उडवणारा कट उघड

Pune crime : प्रेमासाठी मुलाचाच ‘काटा काढला’; आई-प्रियकराचा थरकाप उडवणारा कट उघड

चाकण : प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या आपल्या सहा वर्षांच्या मुलाचा आईने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची धक्कादायक घटना कुरुळी (ता. खेड) येथे घडली होती. या गुन्ह्यातील फरारी मुख्य आरोपी राम विनायक कजेवाड याला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथून सिनेमॅटिक स्टाईलने शनिवारी (दि. १७) बेड्या ठोकल्या. न्यायालयाने प्रियकरास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील निर्दयी आईला पोलिसांनी यापूर्वीच गजाआड केले आहे.

अधिक माहितीनुसार, आरोपी महिला बसरिन मेहबुब शेख (वय २७, रा. पुस, जि. बीड) ही विवाहित असून तिला तीन अपत्ये आहेत. बसरिनचे शेजारी राहणाऱ्या राम कजेवाड याच्याशी तिचे सूत जुळले होते. चार महिन्यांपूर्वी ती आपला ६ वर्षांचा मुलगा आवेज याला घेऊन प्रियकरासोबत कुरुळी येथे राहण्यास आली होती. मात्र, त्यांच्यात प्रेमसंबंधात आवेज अडथळा ठरत होता. याच कारणातून शनिवारी (४ एप्रिल) रात्री ११:३० च्या सुमारास या दोघांनी संगनमत करून आवेजचे डोके बाथरूममधील पाण्याच्या बादलीत बुडवून आणि भिंतीवर जोरात आपटून त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती.

हत्या झाल्यानंतर हा गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी अत्यंत चलाखीने मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव रचला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ते आवेजचा मृतदेह इर्टिगा कारमधून धर्मापुरी (ता. परळी, जि. बीड) येथे घेऊन गेले. मात्र, मुलाच्या शरीरावरील जखमा पाहून फिर्यादी इसाक शेख यांना संशय आला होता. त्यांनी तातडीने परळी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. शवविच्छेदन अहवालात मुलाचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी आई बसरिनची सखोल चौकशी केली आणि तिने गुन्ह्याची कबुली देताच तिच्या मुसक्या आवळल्या.

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी प्रियकर राम कजेवाड हा पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता. दक्षिण महाळुंगे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढला. आरोपी वारंवार आपले ठिकाण बदलत होता. पोलिसांनी त्याचा बीड आणि थेट आंध्र प्रदेशातील तिरुपतीपर्यंत पाठलाग केला. अखेर (दि. १७ एप्रिल) त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. सदर कारवाई दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली. या घटनेने परिसरात आणि आरोपींच्या मूळ गावी मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title : पुणे: माँ, प्रेमी ने बेटे को मारा; चौंकाने वाला षडयंत्र उजागर

Web Summary : पुणे में, एक माँ और उसके प्रेमी ने उसके छह वर्षीय बेटे की हत्या कर दी, जो उनके रिश्ते में बाधा बन रहा था। उन्होंने शुरू में दिल का दौरा पड़ने का नाटक किया, लेकिन पुलिस जांच में सच्चाई सामने आई। प्रेमी को तिरुपति में गिरफ्तार किया गया।

Web Title : Pune: Mother, Lover Kill Son; Shocking Plot Unveiled

Web Summary : In Pune, a mother and her lover murdered her six-year-old son, who was an obstacle to their relationship. They initially faked a heart attack, but police investigation revealed the truth. The lover was arrested in Tirupati.