पुणे : रस्त्यावर फटाके फोडण्यास मज्जाव केल्याप्रकरणी टोळक्याने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याची घटना घडली. हा प्रकार अरणेश्वर भागात घडला. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी शरद क्षीरसागर, ओंकार सूर्यवंशी, नयन कांबळे, सागर लोंढे, कुणाल लोंढे (रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर, सहकारनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस शिपाई राहुल उन्हाळे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आरोपींनी अरण्येश्वर परिसरात फटाके फोडले. रात्रपाळीत गस्त घालणारे पोलीस शिपाई उन्हाळे यांनी त्यांना हटकले.
रस्त्यात फटाके फोडू नका, तसेच मधोमध लावलेली दुचाकी बाजूला काढा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आरोपींनी उन्हाळे यांना धक्काबुक्की केली. झटापटीत उन्हाळे यांचा गणवेश फाटला. शासकीय कामात अडथळा आणणे, धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कोपनर तपास करत आहेत.
Web Summary : Pune police constable assaulted in Araneshwar for stopping a group from setting off fireworks in the street. Five individuals booked for obstructing duty and assault. The incident occurred late Sunday night during a patrol.
Web Summary : पुणे के अरणेश्वर में सड़क पर पटाखे जलाने से रोकने पर पुलिस कांस्टेबल पर हमला। कर्तव्य में बाधा डालने और हमले के लिए पांच लोगों के खिलाफ मामला दर्ज। घटना रविवार देर रात गश्त के दौरान हुई।