शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
2
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
3
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
4
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
5
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
6
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
7
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
8
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
9
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
10
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
11
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
12
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
13
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
14
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
15
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
16
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
17
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
18
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
19
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
20
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट बस स्थानकासमोर पोलीस आणि गांजा तस्करामध्ये थरार;घटना सीसीटीव्ही कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 19:43 IST

- तब्बल ६ किलो गांजा, दोन मोबाईल फोन आणि एक इंजिनिओ क्रिस्टा कार असा एकूण १६,४५,६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.  

पुणे - गांजासह इतर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पुणेपोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.  सुमारे १६ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  पोलिसांकडून या आरोपीना अटक करतांनाचा व्हिडिओ सध्या सोशल चर्चेत आला आहे. सोलापूर वरून गांजा तस्करी करण्यासाठी पुण्यात आलेल्या तिघांना पोलिसांनी स्वारगेट परिसरात पाठलाग करून पकडले आहे.पोलिस आणि तस्कराचा थरार सीसीटीव्ही कैद झाले आहे.  


 
अधिकच्या माहितीनुसार, ही कारवाई १४ जून २०२५ रोजी सायंकाळी स्वारगेट येथील एस.टी. स्टॅंड परिसरात करण्यात आली. मध्यप्रदेशातून आलेल्या तीन इसमांकडे गांजासह इतर अंमली पदार्थ असून ते पुण्यात विक्रीसाठी आणले जात असल्याची गोपनीय माहिती अंमलदारांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून इस्माल शेख (वय २८), नावेद शेख (वय २३) आणि नवनाथ शिंदे या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल ६ किलो गांजा, दोन मोबाईल फोन आणि एक इंजिनिओ क्रिस्टा कार (MH-09-EJ-3323) असा एकूण १६,४५,६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.  

नितीन नरसिंह पाल,अल्ताफ तांबोळी आणि विठ्ठल उर्फ दादा शिवपाल या तिघा आरोपींना पोलिसांनी स्विफ्ट कार सह सहा किलो गांजा आणि स्विफ्ट गाडी सह 16 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, पोलीस निरीक्षक संपतराव राऊत पोलीस आमदार राहुल होळकर,  विक्रम सावंत यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक