Video : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ..! पुण्यात भेसळयुक्त मँगो पल्पचा मोठा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 12:24 IST2026-04-14T12:24:32+5:302026-04-14T12:24:55+5:30

जुलाब, उलट्या, पोटदुखी, अन्नातून विषबाधा यांसारख्या तात्काळ त्रासांबरोबरच दीर्घकाळात कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो,

Pune Crime Playing with the health of citizens Large stock of adulterated mango pulp seized in Pune | Video : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ..! पुण्यात भेसळयुक्त मँगो पल्पचा मोठा साठा जप्त

Video : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ..! पुण्यात भेसळयुक्त मँगो पल्पचा मोठा साठा जप्त

पुणे - जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राक्षेवाडी आणि मावळ तालुक्यातील उरसे येथे अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत भेसळयुक्त मँगो पल्पचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल ३२ किलो मँगो पल्प हस्तगत करण्यात आला असून, सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी अत्यंत अस्वच्छ आणि नियमबाह्य पद्धतीने मँगो पल्प तयार केला जात होता. साखरेऐवजी भेसळयुक्त पदार्थांचा वापर, गाईचे दूध मिसळणे आणि केमिकलयुक्त केशरी रंग टाकून पल्प आकर्षक दिसेल असा प्रयत्न केला जात असल्याचे उघड झाले आहे. या सर्व प्रकारामुळे हा पल्प आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

स्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागात या मँगो पल्पची मागणी वाढली होती. अनेक लहान व्यावसायिक आणि विक्रेते हा पल्प वापरत असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. मात्र, या भेसळयुक्त पल्पमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जुलाब, उलट्या, पोटदुखी, अन्नातून विषबाधा यांसारख्या तात्काळ त्रासांबरोबरच दीर्घकाळात कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने संबंधित ठिकाणांवर छापे टाकून साठा जप्त केला असून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नागरिकांनी स्वस्त दरातील किंवा अनोळखी ठिकाणांहून मिळणारा मँगो पल्प खरेदी करताना सतर्क राहावे, तसेच प्रमाणित आणि विश्वासार्ह उत्पादनांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title : पुणे में मिलावटी मैंगो पल्प जब्त; स्वास्थ्य के लिए खतरा!

Web Summary : पुणे में खेड़ और मावल में मिलावटी मैंगो पल्प का बड़ा स्टॉक जब्त, कीमत ₹2.5 लाख। मिलावटी पदार्थों और कृत्रिम रंगों के उपयोग सहित अस्वच्छ प्रथाओं ने पल्प को खतरनाक बना दिया। जनता से विश्वसनीय स्रोतों से खरीदने का आग्रह किया गया।

Web Title : Adulterated Mango Pulp Seized in Pune; Health Hazard Uncovered!

Web Summary : Pune authorities seized a large stock of adulterated mango pulp in Khed and Maval, valued at ₹2.5 lakhs. Unhygienic practices, including using adulterated substances and artificial colors, made the pulp hazardous. Public urged to buy from trusted sources.