शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Kale Murder: प्लॅन जेलमध्ये, शस्त्र घेण्यासाठी दिले ४५ हजार रुपये; बंडू आंदेकरने सहा महिन्यांपूर्वीच दिली होती गणेश काळेची सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 09:42 IST

Ganesh Kale Murder Case: आंदेकरने दिलेली सुपारी कोंढवा येथे प्रभाव असलेल्या टोळीचा प्रमुख आमीर खानने कारागृहातून वाजवली आहे. यासाठी त्याने त्याचा शूटर अमन शेख याला शस्त्र घेण्यासाठी ४५ हजार रुपये दिले होते.

पुणे : रिक्षाचालक गणेश काळेच्या खुनाची बंडू आंदेकर याने सहा महिन्यांपूर्वीच सुपारी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आंदेकरने दिलेली सुपारी कोंढवा येथे प्रभाव असलेल्या टोळीचा प्रमुख आमीर खानने कारागृहातून वाजवली आहे. यासाठी त्याने त्याचा शूटर अमन शेख याला शस्त्र घेण्यासाठी ४५ हजार रुपये दिले होते. मात्र, हे दीर्घकालीन प्लॅनिंग पोलिसांच्या नजरेतून कसे सुटले? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोंढव्यातील खडी मशीन चौकात भरदिवसा झालेल्या गोळीबारात रिक्षाचालक गणेश काळे याचा खून करण्यात आला. हा खून वनराज आंदेकरच्या खून प्रकरणाचा सूड म्हणून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. ज्याप्रमाणे वनराज आंदेकरवर हल्ला केला, त्याच पद्धतीने गणेश काळे याच्यावर देखील सुरुवातीला गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर कोयत्याने वार करण्यात आले. आंदेकर टोळीचा 

कोंढव्यातील खडी मशीन चौकात भरदिवसा झालेल्या गोळीबारात रिक्षाचालक गणेश काळे याचा खून करण्यात आला. हा खून वनराज आंदेकरच्या खून प्रकरणाचा सूड म्हणून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. ज्याप्रमाणे वनराज आंदेकरवर आहे. ज्याप्रमाणे वनराज आंदेकरवर हल्ला केला, त्याच पद्धतीने गणेश काळे याच्यावर देखील सुरुवातीला गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर कोयत्याने वार करण्यात आले. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आणि त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर यांनी यासाठी सूचना दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीनांसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमीर खानची टोळी कोंढव्यात कार्यरत असली, तरी ती आंदेकर टोळीचाच एक भाग आहे. आमीर खान सध्या निखिल आखाडे खून प्रकरणात जेलमध्ये आहे. तेथे अमन शेखने त्याचीभेट घेतली होती. तेव्हा आमीरने अमनला बंडू अण्णांनी दिलेली सुपारी काहीही करून वाजवायची, असा आदेश दिला होता. त्यासाठी मध्य प्रदेशातून शस्त्र  आणण्यासाठी पैशांची सोय करून दिली. यासाठी अमन शेख आणि अरबाज पटेल यांनी मुख्य भूमिका बजावली. तर अल्पवयीन मुलांनी रेकीचे काम केले. त्यांनी गणेशवर शनिवारी (दि. १) सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत पाळत ठेवली होती.

समर्थक रेकॉर्डवर...आंदेकर टोळीचे समर्थक आणि नंबरकारी मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्वांना रेकॉर्डवर घेण्यात येणार आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील रिल्सचे चाहतेही पोलिसांच्या रडारवर आहेत. या सगळ्यांचे रितसर रेकॉर्ड तयार करून सराईत गुन्हेगारांप्रमाणेच त्यांची नियमित झाडाझडती घेण्यात येणार असल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले.

आणखी एक मकोका : अमितेश कुमारगणेश काळे खूनप्रकरणी आंदेकर टोळीवर आणखी एक मकोका लावण्यात येणार आहे. या टोळीवर अगोदरच तीन मकोका आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Jail plot: ₹45K for weapon; Kale's hit ordered months prior.

Web Summary : Bandu Andekar orchestrated Ganesh Kale's murder from jail, using Amir Khan's gang. A hitman received ₹45,000 for a weapon. Old rivalry fueled the broad daylight killing in Kondhwa. Police are investigating Andekar's network.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यू