Pune Crime : शिरुरला मेफोड्रोनची विक्री करणारा अल्पवयीन ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 12:54 IST2026-04-14T12:53:23+5:302026-04-14T12:54:21+5:30
- अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे १ लाख ३८ हजार ८०० रुपये किमतीचे ६.९४ ग्रॅम वजनी मेफेड्रोन (एम. डी.) नावाचे अमली पदार्थ मिळाले.

Pune Crime : शिरुरला मेफोड्रोनची विक्री करणारा अल्पवयीन ताब्यात
शिरूर : शिरूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करत शिरूर येथे मेफेड्रोनची विक्री करणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. शनिवारी (दि. ११) स्थानिक गुन्हे शाखेचे शिरूर उपविभागातील पथक शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे नियंत्रण आणि अमली पदार्थविरोधी मोहीम राबवत असताना, या पथकाला माहिती मिळाली की, एक विधीसंघर्षित बालक मेफेड्रोन (एम. डी.) या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी शिरूर बायपास येथील बंद पडलेल्या नाना स्पॉट हॉटेलजवळ येणार आहे. ही गोपनीय माहिती वरिष्ठांना कळवून त्यांच्या सूचनांनुसार शिरूर पोलिस स्टेशनच्या मदतीने त्या ठिकाणी सापळा रचून कारवाई केली असता, एक विधिसंघर्षित बालक ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे १ लाख ३८ हजार ८०० रुपये किमतीचे ६.९४ ग्रॅम वजनी मेफेड्रोन (एम. डी.) नावाचे अमली पदार्थ मिळाले.
शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूर पोलिस स्टेशनचे पोनि. संदेश केंजळे, उपनिरीक्षक शुभम चव्हाण, कर्मचारी तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव, अक्षय कळमकर, नीरज पिसाळ यांनी पार पाडली आहे.