शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एका लेकीचा छळ; सासरच्या त्रासाला कंटाळून दीपाने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 19:49 IST

लग्नावेळी दीपाच्या कुटुंबीयांनी एक तोळा एंगेजमेंटमध्ये आणि पाच तोळे लग्नात सोने दिले होते. त्यासोबतच १२ ते १५ लाख रुपयांचा खर्च करत विवाह मोठ्या थाटात पार पाडण्यात आला होता.

- किरण शिंदेपुणे  -  विजापूर जिल्ह्यातील उच्चशिक्षित आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या दीपा उर्फ देवकी गुरूसंगप्पा म्यागेरी (वय २२) या तरुणीने पुण्यातील हडपसर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपा हिचा विवाह काही महिन्यांपूर्वी प्रसाद पुजारी याच्याशी झाला होता. सासरकडील नातेवाईकांच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती तिच्या वडिलांनी पोलिसांना दिली आहे.दीपा ही कला शाखेत पदवीधर असून कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात महिलांना आर्थिक साक्षर करण्याचे कार्य करत होती. तिने गावातील महिलांना एकत्र करून बचत गट स्थापन केला होता. तिच्या कार्याची दखल घेत कर्नाटक सरकारने तिला अधिकृत बचत गट प्रमुख म्हणून नियुक्त केले होते.लग्नावेळी दीपाच्या कुटुंबीयांनी एक तोळा एंगेजमेंटमध्ये आणि पाच तोळे लग्नात सोने दिले होते. त्यासोबतच १२ ते १५ लाख रुपयांचा खर्च करत विवाह मोठ्या थाटात पार पाडण्यात आला होता. तरीही सासरकडून सतत हुंड्याचे आणि मानपानाचे टोमणे मारले जात होते. लग्नानंतर काही दिवसांनी दीपाच्या मामाचा मृत्यू झाल्याने ती मूळ गावी गेली होती. त्यावेळी तिचे सासरे देखील सोबत होते, पण अंत्यविधीच्या दिवशीच त्यांनी तिला परत पुण्यात नेले. त्या काळात दीपाने एकदाच तिच्या आईला त्रास होतोय, असे सांगितले होते.सोमवारी (दि. १९ मे) पुजारी कुटुंबाकडून दीपाच्या नातेवाईकांना फोन आला की दीपा आणि तिचा पती प्रसाद यांच्यात वाद झाले असून त्यांनी विष घेतले आहे. पुण्याच्या वाटेवर असतानाच कुटुंबीयांना दुसरा फोन आला की दीपाचा मृत्यू झाला आहे. मात्र पुण्यात पोहचल्यावर एका खाजगी रुग्णालयात तिचा मृतदेह नव्हता. नंतर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे दीपाचा मृतदेह तिथे सोडून पुजारी कुटुंब पसार झाले होते.या घटनेनंतर दीपाचे वडील गुरूसंगप्पा म्यागेरी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पती प्रसाद पुजारी, सासू सुरेखा पुजारी, सासरे चंद्रकांत पुजारी आणि दीर प्रसन्ना पुजारी यांच्यावर हुंडा प्रतिबंधक कायदा, आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्दैव म्हणजे, घटना घडून दोन दिवस उलटल्यानंतरही अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या दीपाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याWomenमहिला