शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
4
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
5
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
6
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
7
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
8
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
9
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
10
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
11
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
12
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
13
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
14
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
15
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
16
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
17
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
18
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
19
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
20
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: नसरापूर बालिकेच्या हत्येतील आरोपीचा काळा इतिहास उघड; महिलांच्या छळाचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 14:44 IST

Pune crime : परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजच्या आधारे ग्रामस्थांनी आरोपीचा माग काढत त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

नसरापूर (पुणे जि.) : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तपासादरम्यान बालिकेच्या हत्येतील आरोपीवर पूर्वीपासूनच महिलांच्या छळाचे आरोप एका प्रकरणात त्याने शिक्षा भोगल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी पुणे–सातारा महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.अधिकच्या माहितीनुसार, भिमराव कांबळे (वय ६०, रा. साळवडे, ता. भोर) याने “वासरू दाखवतो” असे सांगून चिमुकलीला गुरांच्या गोठ्याकडे नेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बालिका निरागसपणे आरोपीसोबत जाताना दिसत आहे. त्यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केली आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवल्याचे तपासात उघड झाले. सदर बालिका सुट्टीसाठी आजोळी आली होती. बराच वेळ ती दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजच्या आधारे ग्रामस्थांनी आरोपीचा माग काढत त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा आणि तपास प्रक्रिया सुरू ठेवली. मात्र, ग्रामस्थांना योग्य माहिती न दिल्याचा आरोप करत नागरिक आक्रमक झाले. हजारो ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत बाजारपेठ बंद ठेवली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी पुणे–सातारा महामार्गावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तपासादरम्यान बालिकेच्या हत्येतील आरोपीवर पूर्वीपासूनच महिलांच्या छळाचे आरोप एका प्रकरणात त्याने शिक्षा भोगल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. “हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. १५ दिवसांत आरोपपत्र दाखल करून कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. या घटनेमुळे नसरापूरसह संपूर्ण पुणे जिल्हा हादरला असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Nasrapur Girl's Murder Exposes Accused's History of Abuse

Web Summary : Nasrapur rocked by the brutal murder of a toddler after sexual assault. The accused had a past record of harassing women. Villagers protested, demanding justice. Police assured swift action, promising a fast-track trial.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या