बारामतीत तरुणाला सोबत गाडीत घालून नेऊन मारहाण; एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 14:14 IST2026-05-01T14:14:16+5:302026-05-01T14:14:28+5:30

Pune Crime : बारामतीतील रिलायन्स मॉल परिसरात असताना आरोपींनी कारमधून येत त्याला जबरदस्तीने गाडीत बसवले.

Pune Crime A young man was beaten up after being dragged into a car in Baramati; One person was arrested | बारामतीत तरुणाला सोबत गाडीत घालून नेऊन मारहाण; एकास अटक

बारामतीत तरुणाला सोबत गाडीत घालून नेऊन मारहाण; एकास अटक

बारामती: बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील २३ वर्षीय प्रतीक धंगेकर या तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून संबंधित आरोपी पिंटू धुमाळ (रा. कोराळ, तालुका बारामती) या पोलिसांनी अटकही केली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक धंगेकर हा पुण्यात नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. २४ एप्रिल रोजी दुपारी बारामतीतील रिलायन्स मॉल परिसरात असताना आरोपींनी कारमधून येत त्याला जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यानंतर आरोपी धुमाळ याचे पत्नीला अपशब्द वापरले, या कारणावरून त्याचे दोन्ही मोबाईल काढून घेत मारहाण करण्यात आली. तांदुळवाडी रोडवरील एका हॉटेलच्या गोडाऊनजवळ नेऊन आरोपींनी त्याला लाकडी दांडक्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी 'पिंटू धुमाळ याच्या पाया पडून माफी माग' असा दबाव टाकत व्हिडिओ शूट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. तसेच, आरोपींनी त्याच्या खिशातील १५,३०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे. मारहाणीदरम्यान त्याचे घड्याळही तुटून पडले असून ते आरोपींनी उचलून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. गंभीर मारहाण करून आरोपींनी त्याला रस्त्यावर सोडून दिले. तसेच, पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. तक्रारदाराची तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे.

याप्रकरणी पिंटू ऊर्फ शरद धुमाळ, भारत मोहीते, अक्षय सोनवणे, अधिराज मोरे व इतर अनोळखी व्यक्तींविरोधात अपहरण करून मारहाण करणे आणि जबरीने वस्तू काढून घेण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी अटक करण्यात आला असून अटक आरोपी पिंटू ऊर्फ शरद धुमाळ यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल कदम आणि पोलिस जवान दादा दराडे करत आहेत.

Web Title : बारामती में युवक का अपहरण कर मारपीट; एक गिरफ्तार

Web Summary : बारामती में 23 वर्षीय युवक का अपहरण कर मारपीट की गई। आरोपी पिंटू धुमाल गिरफ्तार; अपहरण, मारपीट, लूट का आरोप। पीड़िता को माफी मांगने पर मजबूर किया, जान से मारने की धमकी। पुलिस जांच जारी है।

Web Title : Youth Kidnapped and Beaten in Baramati; One Arrested.

Web Summary : A 23-year-old was kidnapped and assaulted in Baramati. Accused, Pintu Dhumal, arrested for abduction, beating, robbery. The victim was forced to apologize and threatened. Police are investigating further.