पुणे विमानतळावर हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे गिअर निकामी; प्रवाशांचे रात्रीच्या वेळी झाले हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 13:11 IST2026-04-18T13:09:34+5:302026-04-18T13:11:04+5:30

Pune Airport News - धावपट्टीवरील अडथळे दूर करून ती पूर्ववत करण्यासाठी हवाई दल आणि विमानतळ प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.

Pune Airport News Gear of IAF fighter jet fails at Pune airport; passengers face hardship at night | पुणे विमानतळावर हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे गिअर निकामी; प्रवाशांचे रात्रीच्या वेळी झाले हाल

पुणे विमानतळावर हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे गिअर निकामी; प्रवाशांचे रात्रीच्या वेळी झाले हाल

पुणे : भारतीय हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाचे शुक्रवारी (दि.१७) रात्री साडेदहा वाजता एक गिअर निकामी झाले. त्यामुळे विमान तातडीने पुणेविमानतळावर उतरावे लागल्याने धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली. अंदाजे रात्री ११.१५ वाजल्यापासून धावपट्टी बंद करण्यात आली असून सुमारे ३० ते ४० मिनिटे सर्व आगमन आणि प्रस्थान उड्डाणे थांबवण्यात आली. या अचानक झालेल्या अडथळ्यामुळे अनेक उड्डाणे अन्य ठिकाणी वळवावी लागली आणि काही उशिराने चालवण्यात आली.

या घटनेत विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित असून, कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. मात्र, धावपट्टी अनुपलब्ध झाल्याने पुण्याकडे येणारी विमाने पर्यायी व्यवस्था म्हणून सुरत आणि गोवा (मोपा) विमानतळांकडे वळवण्यात आली आहेत. विमान कंपन्यांना याबाबत तत्काळ सूचना देण्यात आल्या असून, प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, धावपट्टीवरील अडथळे दूर करून ती पूर्ववत करण्यासाठी हवाई दल आणि विमानतळ प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, धावपट्टी पुन्हा सुरू होण्यासाठी सुमारे पाच तास लागू शकतात. परिस्थिती लवकर सुरळीत करण्यासाठी विमानतळ संचालक आणि हवाई दलाचे अधिकारी संपर्कात असून, लवकरच नियमित उड्डाण सेवा पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या विमानांचे उड्डाणे अचानक रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

हवाई दलाची एक्सवर माहिती

भारतीय हवाई दलाने आपल्या अधिकृत 'एक्स' हँडलवर सांगितले की आयएएफच्या विमानाशी संबंधित घटनेमुळे पुणे विमानतळाची धावपट्टी तात्पुरती उपलब्ध होणा नाही. मात्र, विमानातील कर्मचारी सुरक्षित असून नागरी मालमत्तेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. धावपट्टी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

तांत्रिक अडचण निर्माण झाली असून ती लढाऊ विमानाशी संबंधित असण्याची शक्यता आहे. सध्या धावपट्टी बंद आहे आणि उड्डाण सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. धावपट्टी कधी सुरू होईल, याबाबत निश्चित सांगता येत नाही. - संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ
 
पुणे विमानतळावर धावपट्टीची समस्या असल्याची माहिती देण्यात आली आणि आमचे विमान अखेरीस मुंबईकडे वळवण्यात आले.- संजय कौल अरिगम, प्रवाशी

Web Title : पुणे हवाई अड्डे पर लड़ाकू विमान में खराबी, उड़ानें बाधित; यात्री फंसे

Web Summary : पुणे हवाई अड्डे पर एक लड़ाकू विमान के गियर में खराबी के कारण रनवे बंद हो गया, जिससे उड़ानें सूरत और गोवा की ओर मोड़ दी गईं। यात्रियों को देरी और असुविधा का सामना करना पड़ा। रनवे के पांच घंटे बाद खुलने की उम्मीद है। अधिकारी सामान्य संचालन बहाल करने के लिए काम कर रहे हैं। कोई हताहत या क्षति नहीं हुई।

Web Title : Fighter Jet Malfunction at Pune Airport Disrupts Flights; Passengers Stranded

Web Summary : A fighter jet's gear malfunction at Pune Airport caused runway closure, diverting flights to Surat and Goa. Passengers faced delays and inconvenience. The runway is expected to reopen after five hours. Authorities are working to restore normal operations. No casualties or damage reported.