शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव गाडीचा टायर फुटून अपघात; एकाचा मृत्यू; वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 10:34 IST

टायर अचानक फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले व ती रस्त्याच्या उजव्या बाजूस रॉंग साईडने खाली गेली

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मुरटी गावाच्या हद्दीत जय मल्हार ढाब्याजवळ भरधाव चारचाकी गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत झालेला युवकच गाडी चालवत होता.  हा अपघात १३ फेब्रुवारी २०२५ रोजी झाला असून याबाबत काल दि. १२ मे रोजी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिकच्या माहितीनुसार, या प्रकरणी डॉ. शुभम हरीभाऊ जगताप (वय २८, रा. धायरी, सिंहगड रोड, बेनकर वस्ती, रो हाउस नं. २४, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा अपघात १३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १.३० च्या सुमारास, ह्युंदाई कंपनीची वेरणा कार (क्रमांक MH 12 TK 9217) मयुर जगताप यांच्या ताब्यात होती. गाडी अत्यंत वेगात चालवली जात असताना उजव्या बाजूचा टायर अचानक फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले व ती रस्त्याच्या उजव्या बाजूस रॉंग साईडने खाली गेली. या अपघातात  मयुर जगताप यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे. फिर्यादीने आपल्या निवेदनात मृत व्यक्तीच अपघातास जबाबदार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस करत असून, गुन्हा नोंद १२ मे २०२५ रोजी  करण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात