शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 15:58 IST

गणेश विसर्जनाला परवानगी दिल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमीत कमी ५५ लाख लोक रस्त्यावर उतरण्याची शक्यता

ठळक मुद्देपुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना निर्मूलन आढावा बैठक

पुणे : कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. यंदाच्या वर्षी आपण वारी, दहीहंडी हे उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. राज्य सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अधिवेशनसुद्धा रद्द केले. त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा. तसेच गणेश विसर्जनाला परवानगी दिल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमीत कमी ५५ लाख लोक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी देणे शक्य नाही  असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. 

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना निर्मूलन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पुणे शहरासह जिल्हयातील अनेक लोकप्रतिनिधी वप्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, पुणे व पिंपरी- चिंचवड मधील कोरोना बाधितबरुग्ण कमी होण्याचे प्रमाण  वाढते आहे ही खूप सकारात्मक आणि समाधानकारक बाब आहे. परंतु, या संकटाचा धोका अजून संपलेला नसून सर्वतोपरी काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कोरोना प्रतिबंधित उपाय योजनांची अंमलबजावणी करताना कोरोना ग्रस्त रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे हे देखील महत्वाचे आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी आपण प्रत्येक उत्सव साधेपणाने साजरा करत प्रशासनाला सहकार्य करत आहोत.तसेच गणेश उत्सव देखील करण्यात यावा.त्याचप्रमाणे गणेश विसर्जनाला परवानगी देणे शक्य नाही असेही पवार यांनी यावेळी अधोरेखित केले. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवारGanesh Mahotsavगणेशोत्सवPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका