Police Commissioner Amitabh Gupta will appear live on Twitter today | पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ट्विटरवर लाईव्ह येणार; पुणेकरांनो, बिनधास्त विचारा प्रश्न!

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ट्विटरवर लाईव्ह येणार; पुणेकरांनो, बिनधास्त विचारा प्रश्न!

पुणे : नमस्कार, पुणे! बऱ्याच दिवसांपासून आपली भेट झाली नाही. आज (सोमवारी) दुपारी ट्विटरवर लाईव्ह भेटूया, अशी साद पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणेकरांना घातली आहे.  #LetsTalkCPPuneCity हे हॅशटॅग वापरून दुपारी १:०० ते २:०० वाजता ट्विट करा असेही आवाहन त्यांनी यानिमित्ताने पुण्यातील नागरिकांसाठी केले आहे. 

पूजा चव्हाण प्रकरणात प्रश्नाला उत्तर न देता हसून निघून गेल्याने माध्यमातून पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या बातम्या झाल्या होत्या. आता स्वत: पोलीस आयुक्त ट्विटरवर लाईव्ह भेटणार आहेत. सोमवारी दुपारी १ ते २ वाजण्याच्या सुमारास ते लेटस टॉक सीपी पुणे सिटी या हॅशटॅगवर भेटणार आहेत. त्यांना आपले प्रश्न या हॅशटॅगवर ट्विट करता येणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Police Commissioner Amitabh Gupta will appear live on Twitter today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.