शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 18:17 IST

Pune Municipal Election 2026: पुणे महापालिकेच्या निवडणुकीत कुख्यात गुंड बंडू आंदेरकरच्या घरातील तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे सध्या तुरुंगात असलेल्या त्याच्या कुटुंबातील दोघांनी अजित पवारांकडून उमेदवारी देण्यात आली आहे. 

Pune Municipal election 2026 Ajit Pawar: हत्या प्रकरणातील कुख्यात गुंड बंडू आंदेकरने पुणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्याच्या कुटुंबातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनीही अर्ज दाखल केला होता. त्यांना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार, याबद्दल उत्सुकता होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ती बाब समोर आली. अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसकडून दोघींच्या उमेदवारीबद्दल गुप्तता पाळण्यात आली होती. पण, वकील आला आणि त्याने एबी फॉर्म दिला. त्यानंतर बातमी फुटली. 

आयुष कोमकर हत्या प्रकरणातील बंडू आंदेकर, खंडणी प्रकरणातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हे तिघे तुरूंगात आहेत. त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. प्रभाग क्रमांक २३ मधून दोघींनी अर्ज दाखल केला. विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात जाऊन तिघांनी उमेदवारी अर्ज भरला होता. 

गुन्हेगारीमुळे गुप्तता पाळली, पण...

बंडू आंदेकरसह लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर या तिघांना न्यायालयाने सशर्त अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली होती. २७ डिसेंबर रोजी तिघांनी अर्ज भरला. गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या उमेदवारीबद्दल गोपनीयता बाळगण्यात आली होती. 

मंगळवारी (३० डिसेंबर) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आंदेकरांचे वकील आले आणि त्यांनी एबी फॉर्म दाखल केले. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून उमेदवारी देण्यात आल्याचे समोर आले. 

बंडू आंदेकर हा आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे. तर सोनाली आणि लक्ष्मी यांच्याविरोधात ५ कोटी ४० लाख खंडणीचा गुन्हा आहे. तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 

गजा मारणेच्या पत्नीलाही उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे हिलाही उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तीन गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) वादात सापडण्याची चिन्हे आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : PMC Election: Ajit Pawar fields alleged gangsters' kin; secrecy broken.

Web Summary : Ajit Pawar's NCP nominated relatives of alleged criminals Bandoo Andekar for Pune's PMC election. Despite secrecy due to their criminal background, lawyer revealed the candidacy, sparking controversy.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण