पिफ आठवडाभरासाठी पुढे ढकलला; आता ४ ऐवजी ११ मार्चपासून पिफ रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 05:30 PM2021-02-26T17:30:43+5:302021-02-26T17:31:25+5:30

यंदा कोरोनामुळे चित्रपटगृहांबरोबरच ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून देखील महोत्सवाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.

Piff postponed for a week; PIF will be painted from March 11 instead of March 4 | पिफ आठवडाभरासाठी पुढे ढकलला; आता ४ ऐवजी ११ मार्चपासून पिफ रंगणार

पिफ आठवडाभरासाठी पुढे ढकलला; आता ४ ऐवजी ११ मार्चपासून पिफ रंगणार

Next

पुणे : शहरातील सध्याची कोरोनाची स्थिती पाहाता पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) आठवडाभर पुढे ढकलण्यात आला आहे. पिफला येत्या 4 मार्चपासून प्रारंभ होणार होता. मात्र आता पिफ 11 ते 18 मार्च दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.

राज्यात कोरोनाबाधित रूग्णांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लग्नकार्यासह सांस्कृतिक कार्यक्रमांवर दि.28 फेब्रुवारीपर्यंत निर्बंध आणले आहेत. कोरोनाची वाढती संख्या ही आयोजकांसाठी देखील चिंतेची बाब ठरत आहे. पिफ हा शासनाचा अधिकृत महोत्सव आहे. शासन काय निर्णय घेते? याकडे सर्वांचेच लक्ष्य लागले आहे. हा महोत्सव आठवडाभर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी कळविले आहे.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दरवर्षी पुण्यात होणाऱ्या या महोत्सवाचे हे सलग १९ वे वर्ष असून, यापूर्वी ४ ते ११ मार्च दरम्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा कोरोनामुळे चित्रपटगृहांबरोबरच ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून देखील महोत्सवाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. फक्त तारखा बदलण्यात आल्या आहेत. याशिवाय राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत ५० टक्के इतक्याच क्षमतेने चित्रपटगृहात महोत्सव होईल.

यावर्षी सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर, लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि कॅम्प परिसरातील आयनॉक्स या ३ ठिकाणी ७ स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट दाखविले जाणार असून www.piffindia.com या संकेतस्थळावर इच्छुकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

Web Title: Piff postponed for a week; PIF will be painted from March 11 instead of March 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.